VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 20:04 IST2025-10-01T20:03:22+5:302025-10-01T20:04:05+5:30
Saree Garba Ritual at Sadu Mata Ni Pol Tradition viral video : २०० वर्षांपासून सुरू आहे ही खास परंपरा

VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
Saree Garba Ritual at Sadu Mata Ni Pol Tradition viral video : नवरात्रीच्या पवित्र उत्सवात उत्साहाचे अनेक रंग दिसतात. लोक मोठ्या उत्साहात नऊ दिवस गरबा आणि दांडीया नृत्य खेळतात. विविध रंगसंगतीचे कपडे परिधान करून, महिला आणि पुरूष मोठ्या संख्येने गरबा खेळताना दिसतात. परंतु गुजरातमधील अहमदाबाद येथील एका अनोख्या विधीने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सदू माता नी पोळ या परिसरात पुरुष साड्या नेसून गरबा ( साडी गरबा विधी ) सादर करतात. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण ही तब्बल २०० वर्षांपेक्षाही जुनी परंपरा आहे.
सध्या या परंपरेचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ @awesome.amdavad नावाच्या अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे की, अहमदाबादच्या सदू माता नी पोळमधील साडी गरबा परंपरा..!! हा विधी दरवर्षी नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री बारोट समुदायातील पुरुष मिळून साजरे करतात. पाहा व्हिडीओ-
नेमकी काय आहे परंपरा?
स्थानिक कथेनुसार, २०० वर्षांपूर्वी सदुबेन नावाच्या एका महिलेने एका मुघल सरदारापासून स्वतःला वाचवण्यासाठी बारोट समाजातील पुरुषांकडून मदत मागितली. जेव्हा पुरुष तिचे रक्षण करण्यात अयशस्वी झाले, तेव्हा सदुबेनने तिचे मूल गमावले. संतापलेल्या आणि दुःखी झालेल्या सदुबेनने पुरुषांना शाप दिला की त्यांच्या भावी पिढ्या भित्र्या असतील. त्यानंतर त्या सती गेल्या. या शापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि सदुबेनच्या शापाचा आदर व्यक्त करण्यासाठी, बारोट समाजातील पुरुष दरवर्षी अष्टमीला या साड्या नेसतात आणि गरबा करतात.