Meet 68 year old woman who is cycling towards vaishno devi near about 2200 km | सलाम! .....म्हणून ६८ वर्षांच्या मराठमोळ्या आजी सायकलवर करताहेत २ हजार किमी प्रवास

सलाम! .....म्हणून ६८ वर्षांच्या मराठमोळ्या आजी सायकलवर करताहेत २ हजार किमी प्रवास

नवरात्रीच्या नऊ दिवसात स्त्री शक्तीचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. महिलेची जिद्द आणि इच्छाशक्ती यांचा प्रत्यय येईल अशी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजकाल प्रत्येकालाच फिरण्यासाठी महागडी गाडी किंवा सायकल हवी असते. सायकलवर प्रवास करण्याची मजाच काही वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ६८ वर्षांच्या आजी सायकलवर तब्बल २ हजार किमीपेक्षा जास्त अंतर पार करणार आहेत. 

तरूण वयातले लोकही सायकलवर काही किलोमीटर अंतर पार करायला कंटाळा करतात. पण इथे तर आजीच आपली साडी कमरेला खोचून प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत. वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी या आजी इतक्या लांबचा प्रवास करणार आहेत. या आजी महाराष्ट्रातील खामगावाच्या रहिवासी आहेत. फिट भारत या ट्विटर अकाऊंटवरून या आजींचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दिली असून आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.  १ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केलं आहे. "मला बोलू द्या ना", मराठमोळ्या बापलेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही म्हणाल वाह, क्या बात है...

जीवनात अशा देवस्थानाची यात्रा करणं किंवा  तीर्थयात्रा केलेल्या माणसांना भेटणं भाग्यशाली समजलं जातं. अनेकांनी या व्हिडीयोला कमेंट करून या आजींना सलाम केलं आहे. तर अनेक युजर्सनी या आजींसाठी देवीकडे प्रार्थना केली आहे. सध्या नवरात्रीचे दिवस असल्यामुळे आजींच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होताना दिसून येत आहे.  सोशल मीडिया युजर्सनी पुढील प्रवासासाठी आजींना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा हा व्हिडीओ आहे. 

काय सांगता? वाळवंटी प्रदेशात आढळली तब्बल 2000 वर्षे जुनी 121 फुटांची "मांजर"

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Meet 68 year old woman who is cycling towards vaishno devi near about 2200 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.