चिमुकल्याला कुशीत घेत डोक्यावर लाईट पकडून चालत होती माऊली; फोटो पाहून उद्योगपती म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 15:30 IST2021-03-22T15:25:38+5:302021-03-22T15:30:55+5:30
Trending Viral News in Marathi : सोशल मीडिया युजर्सनी या फोटोचे भावनिक वर्णन केले असून आईचे धैर्य आणि आत्म्यास सलाम केला आहे.

चिमुकल्याला कुशीत घेत डोक्यावर लाईट पकडून चालत होती माऊली; फोटो पाहून उद्योगपती म्हणाले....
उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka)सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. ते मजेदार ट्विट आणि विनोदी व्हिडीओ शेअर करुन आपल्या फॉलोअर्सचे मनोरंजन करतात. यावेळी त्याने एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता एक महिला डोक्यावर लाईट घेऊन, कुशीत आपल्या तान्हुल्या बाळा घेत (Mother Carrying Baby With Light In Baraat) वरातीत चालत आहे. ट्विटरवर सोशल मीडिया युजर्सनी या फोटोचे भावनिक वर्णन केले असून आईचे धैर्य आणि आत्म्यास सलाम केला आहे.
I feel like I put in too much effort sometimes. And then I saw this photo! My salute! pic.twitter.com/i8vUbLybB6
— Harsh Goenka (@hvgoenka) March 21, 2021
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता वरातीत नवरा घोड्यावर बसला आहे. तर ही महिला डोक्यावर लाईट पकडून उभी आहे. तिच्या खांद्यावर एक झोला लटकवलेला तुम्ही पाहू शकता. या झोळीत तीचं बाळ तुम्हाला दिसून येईल. हा फोटो शेअर करत हर्ष गोयंकांनी कॅप्शन दिलं आहे, 'मला असं वाटतं की, मी कधी कधी खूप मेहनत करतो.' नंतर मला हा फोटो दिसला, माझा सलाम आहे तुम्हाला. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......
उद्योगपती हर्ष गोयंकांनी २१ मार्चच्या संध्याकाळी हा फोटो शेअर केला होता. आतापर्यंत १५ हजाराहून अधिक लाईक्स आणि दीड हजार री-ट्वीट या व्हिडीओला मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सिमी गैरेवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, 'आणि ती मुलाला झोळीमध्ये घेऊन जाते.' सोशल मीडिया युजर्स हा फोटो पाहून भावूक झाले आहेत. खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ