खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 11:53 AM2021-03-21T11:53:26+5:302021-03-21T12:06:20+5:30

Trending Viral Video in Marathi : पोलिसांनी टँकरमधून तेल लुटणार्‍या लोकांची गर्दी कशीबशी हटवली. या वेळेत ठप्प झालेला महामार्ग आणि रहदारी सुरळीत झाली. 

Dewas watch video of villagers reach to extarct oil from overturned tanker | खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ

खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

इंदूर-बैतूल महामार्गावरील बरिनाकाजवळ खाद्य तेलाने भरलेला टँकर पलटला आहे. महामार्गावर टँकर चालवताना चालकाचा ताबा सुटला आणि मोहरीच्या तेलाने भरलेले टँकर पलटला आहे. अपघातानंतर पोलिसांना कळविण्यात येईपर्यंत आसपासच्या लोकांना तेलाचा टँकर पलटी झाल्याची माहिती मिळाली होती. टँकरमधून तेल काढण्यासाठी काहीजण डब्बे तर काहीजण कॅन घेऊन पोहोचले. मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण तेल घेण्यासाठी भांडत होते.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे महामार्गावरही वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांच्या उपस्थितीतही लोक निर्भिडपणे टँकरमधून तेल घेत होते. एवढेच नव्हे तर रस्त्यावरून जाणारे अन्य लोकही ही लूट करण्यासाठी सामील होते.  व्हिडिओमध्ये, आपण तेल लुटण्यात गुंतलेल्या लोकांची संभाषणे देखील ऐकू शकता. त्याच वेळी, लोकांमधील हापापलेपणा तुम्हाला पाहायला मिळेल. लोक टँकरमधून तेल काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्..

यावेळी वाहन चालकांना बराचवेळ त्रास सहन करावा लागला. पोलिसांच्या सर्व प्रयत्नांनंतरही तेलाच्या टँकरमधून तेल लुटण्यासाठी आलेले लोक  लांब हटण्यास तयार नव्हते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पोलिसांच्या उपस्थितीतही लोक टँकरमधून तेल घेत आहेत. मात्र, पोलिसांनी टँकरमधून तेल लुटणार्‍या लोकांची गर्दी कशीबशी हटवली. या वेळेत ठप्प झालेला महामार्ग आणि रहदारी सुरळीत झाली. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......

Web Title: Dewas watch video of villagers reach to extarct oil from overturned tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.