सेलिब्रिटींची लग्ने 'या' व्यक्तीच्या लग्नासमोर फेल, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 12:13 IST2018-12-26T12:09:07+5:302018-12-26T12:13:57+5:30

गेल्याकाही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींची लग्ने चांगलीच गाजली. ही लग्ने इतकी भव्य-दिव्य आणि शाही होती की, सगळीकडे केवळ तिच चर्चा होती.

This mans wedding beats celebrity grand wedding with simple shaadi going viral on social media | सेलिब्रिटींची लग्ने 'या' व्यक्तीच्या लग्नासमोर फेल, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

सेलिब्रिटींची लग्ने 'या' व्यक्तीच्या लग्नासमोर फेल, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

गेल्याकाही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींची लग्ने चांगलीच गाजली. ही लग्ने इतकी भव्य-दिव्य आणि शाही होती की, सगळीकडे केवळ तिच चर्चा होती. मग ते दीपिका-रणवीर लग्न असो, प्रियांका-निकचं असो किंवा ईशा अंबानीचं असो. या लग्नांना मोठमोठ्या व्यक्तींनीही हजेरी लागली. अर्थातच या लग्नासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले असतील. इतका खर्च एका सर्वसामान्य व्यक्तीसाठी शक्य नाही. पण सध्या एका अशा व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली आहे, ज्याने केवळ २० हजार रुपयात लग्न केलं. 

पाकिस्तानचा रिजवानच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियात जोरदार सुरु आहे. सोशल मीडियातून त्यांचं कौतुक केलं जातं आहे. रिजवानचं लग्न फारच साध्या पद्धतीने पार पडलं. त्याने फार जास्त कुणाला न बोलवता केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईकांना या लग्नासाठी आमंत्रित केलं होतं. एकीकडे लोक लग्नात कपडे आणि बॅन्डवर भरमसाठ पैसा खर्च करतात, तिथे दुसरीकडे रिजवानने शानदार खाण्यावर पैसे खर्च केले. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रिजवानने लग्नाचं रिसेप्शन घराच्या टेरेसवर दिलं. याची सजावट त्याच्या वडिलांनी केली. 


रिजवानने सोशल मीडियात त्याच्या लग्नाचे डिटेल्स शेअर करत लिहिले की, मी माझ्या लग्नाचं बजेट केवळ २० हजार रुपये ठेवलं होतं. माझ्या एका मित्राने शेफ दिला. मांस आणि मसाले विकत आणले व जेवण तयार करण्यास आम्हीच मदत केली. पत्नीने स्टार्टरमध्ये आंबट बटाटे तयार केले. माझ्या वडिलांनी टेसेस झालरने सजवलं. 



 


त्याने पुढे लिहिले की, मी शेजाऱ्यांकडून २५ खुर्च्या उधार आणल्या होत्या. मी आणि माझ्या पत्नी निळ्या रंगाची सलवार-कुर्ता परिधान केला होता. हे कपडे आम्हाला बहीण आणि आईने गिफ्ट केले होते. आम्ही अर्ध्या रात्रीपर्यंत एन्जॉय केलं. रिजवानने एक फोटो शेअर करत सांगितले की, आनंद मिळवा, तुम्हाला जे करायचंय ते करा. खूश रहा. 

Web Title: This mans wedding beats celebrity grand wedding with simple shaadi going viral on social media