Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:41 IST2026-04-12T11:40:32+5:302026-04-12T11:41:42+5:30

Manav Shah : करिअरची सुरुवात शानदार होती, सर्व काही सुरळीत चाललं आहे असं वाटत होतं, पण आतून त्यांना काहीतरी कमतरता जाणवत होती.

Manav Shah left 40 lakh uk job returned to india know the reason | Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?

Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?

परदेशातील नोकरीला अनेकदा 'ड्रीम जॉब' मानलं जातं, विशेषतः अमेरिका, युरोप आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये. पण तिथले आयुष्य खरोखरच तितकं उत्कृष्ट असते का, जितके ते लांबून दिसतं? याच प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक गोष्ट वेगाने व्हायरल होत आहे, जी लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. ही गोष्ट आहे फिजिओथेरपिस्ट मानव शाह यांची, ज्यांनी युके (UK) मध्ये वर्षाला तब्बल ४० लाख रुपयांची नोकरी मिळवली होती. करिअरची सुरुवात शानदार होती, सर्व काही सुरळीत चाललं आहे असं वाटत होतं, पण आतून त्यांना काहीतरी कमतरता जाणवत होती.

मानव शाह यांच्या सांगण्यानुसार, चांगला पगार आणि उत्तम लाईफस्टाईल असूनही त्यांना आपल्या नोकरीत एका प्रकारचं बंधन जाणवत होते. त्यांनी सांगितलं की, अनेकदा त्यांना असं वाटायचं की ते एखाद्या बंदिस्त ठिकाणी, जणू जेलमध्ये आहेत. म्हणजेच पैसे असूनही त्यांना स्वातंत्र्याची उणीव भासत होती. त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा होती. एक उद्योजक बनण्याचं स्वप्न त्यांच्या मनात नेहमीच होतं, पण युकेमधील '९ ते ५' ची नोकरी त्यांना ती संधी देऊ शकत नव्हती. याच कारणामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ते आपल्या इच्छेनुसार स्वतःचं करिअर घडवू शकतील.


परदेशातील एकटेपणा खूप त्रासदायक

केवळ करिअरच नाही, तर भावनिक कारणंही या निर्णयामागे होती. मानव शाह यांनी मोकळेपणाने सांगितलं की, परदेशातील एकटेपणा खूप त्रासदायक ठरतो. आई-वडील आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवल्याने जो आनंद मिळतो, तो कोणत्याही पैशापेक्षा किंवा लाईफस्टाईलपेक्षा मोठा असतो, असं त्यांनी नमूद केलं. याशिवाय त्यांनी एका व्यावहारिक पैलूवरही भाष्य केलं. त्यांच्या मते, भारतात राहणं अधिक परवडणारं आहे, जिथे कमी खर्चात चांगली बचत होऊ शकते आणि आवश्यक सुविधाही सहज उपलब्ध होतात.

'पैसा सर्व काही नसतो'

जसा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला, तशा लोकांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. अनेक युजर्सनी म्हटले की 'पैसा सर्व काही नसतो', तर काहींनी त्यांचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. अनेकांनी त्यांच्या या अनुभवाशी स्वतःला जोडून पाहिलं. आजच्या काळात जिथे प्रत्येकजण परदेशात जाण्याचं स्वप्न पाहतो, तिथे ही गोष्ट एक वेगळा दृष्टीकोन मांडते. यश म्हणजे केवळ परदेशातील नोकरी नसून आयुष्यात आनंद, स्वातंत्र्य आणि आपल्या माणसांची साथही तितकीच महत्त्वाची आहे, हेच ही गोष्ट अधोरेखित करते.
 

Web Title : उच्च वेतन वाली यूके नौकरी छोड़ी: युवक भारत लौटा।

Web Summary : फिजियोथेरेपिस्ट मानव शाह मोटी तनख्वाह के बावजूद यूके की 'ड्रीम जॉब' से निराश होकर भारत लौट आए। उन्होंने फंसा हुआ महसूस किया, उद्यमिता को आगे बढ़ाने और परिवार के साथ रहने की खुशी को याद किया। उन्होंने भारत में रहने की सामर्थ्य का भी उल्लेख किया।

Web Title : Left high-paying UK job: Young man returns to India.

Web Summary : Frustrated with a UK 'dream job' despite a handsome salary, physiotherapist Manav Shah returned to India. He felt trapped, missing the freedom to pursue entrepreneurship and the joy of being with family. He also noted the affordability of living in India.