VIDEO: या काकांचा कुठं करताय नाद; जेसीबीनं खाजवताहेत पाठ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 04:10 PM2020-10-15T16:10:28+5:302020-10-15T16:21:33+5:30

काकांनी JCB ने पाठ खाजवून घेतली आणि जगाला हे दाखवून दिलं की, भारतीय लोक जुगाडाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. हा फेसबुक व्हिडीओ Abdul Nasar नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Man uses JCB to scratch his back watch funny viral video | VIDEO: या काकांचा कुठं करताय नाद; जेसीबीनं खाजवताहेत पाठ...

VIDEO: या काकांचा कुठं करताय नाद; जेसीबीनं खाजवताहेत पाठ...

Next

तळहात खाजवल्यावर कुणालाही वाटतं की, पैसा मिळणार आहे. पण जेव्हा पाठ खाजवते तेव्हा असं वाटतं कुणीतरी मदत करावी.  कारण हाताने पाठ खाजवणं जरा अवघड काम असतं. त्यामुळेच तर बाजारात पाठ खाजवण्यासाठी वेगवेगळी उपकरणे मिळतात. पण एका काकांनी तर कमालच केली. या काकांनी JCB ने पाठ खाजवून घेतली आणि जगाला हे दाखवून दिलं की, भारतीय लोक जुगाडाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. हा फेसबुक व्हिडीओ Abdul Nasar नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

या व्हिडीओला आतापर्यंत ४ हजारांपेक्षा लाइक्स मिळाले आहेत आणि हजारो व्ह्यूजही मिळाले आहेत. सोबतच हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअरही करण्यात आला. (उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट; थरकाप उडवणारा Video तुफान व्हायरल)

या तुम्ही बघू शकता की, एका वृद्ध काका आपल्या दुपट्ट्याच्या मदतीने पाठ खाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशात अचानक ते बाजूला उभे असलेल्या जेसीबी मशीनच्या पंजाजवळ जातात. मशीन चालवणारा व्यक्ती जेसीबीच्या पंजाने या काकांची पाठ खाजवून देतो. या व्हिडीओच्या शेवटी हे दिसून येतं की हा व्हिडीओ फक्त गंमतीसाठी तयार करण्यात आलाय. (बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ)

काकांचा हा कारनामा पाहून सोशल मीडियावरील लोक हैराणही झालेत आणि त्यांना हसूही येत आहे. काही यूजर्सनी लिहिले की, हा स्टंट फारच धोकादायक आहे. जर काही गडबड झाली तर जखमीही होऊ शकता. तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
 

Web Title: Man uses JCB to scratch his back watch funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.