Man smashed 49 coconut blindfolded with student made guinness book record | बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ

बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओज किंवा घटना पाहून डोकं सुन्न होतं.  काहीवेळा वेगवेगळ्या कलांचा अविष्कार तर कधी असाध्य गोष्टी साध्य करून दाखवलेल्या असतात. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मार्शल आर्ट्स पी. प्रभाकर रेड्डी आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यासह एक पराक्रम केला आहे. डोळ्यांना पट्टी बांधून ४९ नारळ फोडले आहेत. हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहील. १५ सप्टेंबर २०२० त्यांनी हा वर्ल्ड रेकॉर्ड  केला आहे. एएनआयशी बोलताना या मार्शल आर्ट्स संस्थेतील प्रशिक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर नारळ टाकून ठेवले आहेत.  डोळ्यांना पट्टी बांधून एका  हातोड्याच्या साहाय्याने नारळं फोडताना दिसून येत आहेत. प्रभाकर रेड्डी यांचा विद्यार्थी राकेश हा खाली रस्त्यावर झोपला आहे. त्यानंतर प्रभाकर हे टप्प्याटप्प्याने फोडत आहेत. जराही तोल गेला असता तर राकेशच्या कोणत्याही अवयवला दुखापत झाली असती. पण अत्यंत हुशारीने  खाली झोपलेल्या राकेशला धोका पोहोचून न देता सर्व नारळ फोडले आहेत. हा पराक्रम करण्याआधी कशाप्रकारे पूर्वतयारी करण्यात आलेली हे तुम्ही पाहू शकता. अरे बाप रे बाप! शेतकऱ्याने पिकवली तब्बल १७ किलो वजनाची एक कोबी, आकार पाहून सगळेच हैराण...

उत्सूकता ताणून धरणारा आणि तितकाच थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे. वृत्तसंस्था एनएनआयने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून नेटिझन्सनी या व्हिडीओला तुफान प्रतिसाद दिला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता आजूबाजूला असलेल्या लोकांनाही या थरारक प्रकारचे आकर्षण वाटत असल्यामुळे मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरुवात केली आहे. १ नंबर जोडपं! व्हायरल झालेल्या 'Baba Ka Dhaba' च्या रडणाऱ्या आजोबांची लव्हस्टोरी माहित्येय का?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Man smashed 49 coconut blindfolded with student made guinness book record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.