चालायचा कंटाळा केला अन् शॉर्टकट चांगलाच अंगाशी आला; भररस्त्यात झाली अशी फजिती, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 19:33 IST2021-02-24T19:21:34+5:302021-02-24T19:33:28+5:30
Trending Viral News in Marathi : शॉर्टकटमुळे अनेकदा आपल्या मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो. सोशल मीडियावर एका थरारक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चालायचा कंटाळा केला अन् शॉर्टकट चांगलाच अंगाशी आला; भररस्त्यात झाली अशी फजिती, पाहा व्हिडीओ
रस्ता ओलांडण्यासाठी त्याने दुभाजकावरून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा प्रयत्न अंगलट येऊन त्याची फजिती झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकदा काही गोष्टी करायच्या कंटाळा आल्यामुळे आपण शॉर्टकटचा वापर करतो. शॉर्टकटमुळे अनेकदा आपल्या मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो. सोशल मीडियावर एका थरारक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चीनमधील जुहाई येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला दुभाजकांवरून गाडी नेणं चांगलंच महागात पडलं आहे. उडी मारून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना, तो रेलिंगसह खाली पडला आहे. हा व्हिडिओ पिपल्स डेलीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. फक्त एक बी लावली अन् ७० दिवसात झाडाला लागली भरपूर वांगी; व्हिडीओ पाहून IAS म्हणाले...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, , एक व्यक्ती रस्त्यावर वाहनं असताना दुभाजकावर चढून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. हा दुभाजकावर चढल्यानंतर लगेचच संतुलन बिघडत आहे. यावेळी हा माणूस एकटाच खाली पडला नाही तर दुभाजकसुद्धा या माणसाच्या अंगावर पडलं आहे. मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय