मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:49 PM2021-02-24T12:49:31+5:302021-02-24T13:03:43+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

Daily habits that are hurting your spine and giving you back pain | मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

Next

कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.  गेल्या १९ दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असलेली दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुण्यात २८ फेब्रुवारीला शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यूसुद्धा लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहिम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत ९ लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तज्ज्ञांनी लसीकरण आणि रोजचा मास्कचा वापर याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

मास्क लावल्यानं डोकेदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तेव्हा काय करायचं?

गुवाहाटी येथील वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अनूप बर्मन म्हणतात, "लोकांना अशा बर्‍याच समस्या कळल्या आहेत, परंतु अशा समस्या केवळ एन-९५ मास्क लावत असलेल्यांनाच होतात." म्हणून, आरोग्य कर्मचारी वगळता प्रत्येकाने कापडाचा ट्रिपल लेयर मास्क लावावा. याशिवाय मास्क लावून संरक्षण मिळाल्यास गर्दी नसलेल्या ठिकाणी थोडेसे उघडता येतील.

डॉ. अनुम बर्मन यांनी सांगितले की, ''लस घेतल्यानंतर आपण पूर्णपणे सुरक्षित राहता असं अजिबात नाही. कारण ४५ दिवसांनी शरीरात इम्यूनिटी पूर्णपणे तयार होते. त्यापूर्वी पूर्ण सुरक्षिततेचा दावा करू शकत नाही. आपल्याला त्या दरम्यान मास्क लावावा लागेल. या व्यतिरिक्त, जर मास्क नियमितपणे लावले आणि सोशल डिस्टेंसिंग पाळले गेले तरच लस घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसचा धोका कमी करता येऊ शकतो.

''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच त्यांना देखील लसीकरण करुन घ्यावे लागेल.'' असं तज्ज्ञ सांगतात.

किडनीच्या रुग्णांनी लस टोचून घ्यायला हवी

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, 'जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच ते देखील त्यांना करुन घ्यावी लागेल.

हृदयरोगाशिवाय इतर अनेक रोग असतील तर ते लसी घेऊ शकतात?

डॉ. अनूप बर्मन म्हणतात, ''जर एखाद्याला किडनीचा आजार झाला असेल किंवा डायलिसिस झाला असेल तर त्यांना कोविडचा जास्त धोका आहे. म्हणून, अशा लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाला लसी दिली जात आहे, तशीच इतर आजार असलेल्या लोकांनीही लस घ्यायला हवी.''

हृदयविकाराचा किंवा इतर काही आजार असल्यास नियमित औषधे घेतल्यास लस घेण्यास काहीच हरकत नाही. यासाठी, एकदा डॉक्टरांकडून तपासणी केली जाऊ शकते. बीपी नियंत्रित झाला असावा, थायरॉईड वाढलेला असू नये किंवा कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही, याची खात्री करुन घ्या.  मध्यरात्री भूक लागल्यावर खाऊ शकता 'हे' स्नॅक्स; वजनही वाढणार नाही!

कोविड लसीकरणाची काय स्थिती आहे?

कोविड लसीकरण वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लसी देण्यात आली आहे, तर सुमारे 11 हजार आरोग्य कर्मचारी वर्गाला दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात कोविशील्ड आणि कोवाक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी  दिल्या जात आहेत. या दोन्ही लसींचे कोणतेही गंभीर मोठे साईड इफेक्टस् दिसून आलेले नाहीत. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो

Web Title: Daily habits that are hurting your spine and giving you back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.