आता बोला! ७ तास केवळ झोपून टॅक्सी ड्रायव्हरने बनवला व्हिडीओ अन् कमावले ११ लाख रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:50 PM2021-02-18T13:50:45+5:302021-02-18T13:55:49+5:30

Social Viral : लोक अनेक वर्ष मेहनतीने काम करतात, पण ते लखपती होऊ शकत नाही. पण एक व्यक्ती आहे ज्याने केवळ १ झोप काढून लाखो रूपये कमावले.

Man slept for 7 hours make 11 lakh rupees with one video | आता बोला! ७ तास केवळ झोपून टॅक्सी ड्रायव्हरने बनवला व्हिडीओ अन् कमावले ११ लाख रूपये!

आता बोला! ७ तास केवळ झोपून टॅक्सी ड्रायव्हरने बनवला व्हिडीओ अन् कमावले ११ लाख रूपये!

Next

Social Viral : एखादा माणूस केवळ झोप काढून पैसे कसे कमावू शकतो? जर पैसे कमावणं इतकं सोपं असेल तर मग लोक इतकी धावपळ कशाला करतात? झोपा काढा आणि पैसे कमवा. लोक अनेक वर्ष मेहनतीने काम करतात, पण ते लखपती होऊ शकत नाही. पण एक व्यक्ती आहे ज्याने केवळ १ झोप काढून लाखो रूपये कमावले.

या तरूणाचं वय २६ वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्याने ७ तास झोप काढून तब्बल ११ लाख रूपये कमावले आहेत. तो झोप घेत असताना लोकांनी त्याला डिस्टर्ब करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यातूनच त्याने लाखो रूपये कमावले आहेत. (हे पण वाचा : 'या' कपलने रेस्टॉरन्टला दिली लाखो रूपयांची टिप, कारण वाचून व्हाल अवाक्...)

हा तरूण Asian Andy नावाने एक यूट्यूब चॅनल चालवतो. तो गेमिंग स्ट्रीमिंगही करतो. त्याने एक लाइव्ह स्ट्रीम केलं. यात तो झोपलेला आणि लोक त्याला डोनेट करून डिस्टर्ब करत आहेत. यातूनच त्याने इतकी मोठी रक्कम जिंकली आहे. Times Now च्या रिपोर्टनुसार, त्याला बघणारे लोक त्याला वेगवेगळ्या प्रकारचे साउंड पाठवत होते. जेणेकरून त्याला डिस्टर्ब व्हावं. अनेकांनी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच ते काही डॉलरही पाठवत होते. (हे पण बघा : VIDEO : महिलेने एक्स बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर चहा फेकण्याची दिली ऑर्डर, डिलीवरी बॉयने तेच केलं आणि...)

या व्हिडीओतून त्याने एकूण १६ हजार डॉलर कमावले आहेत. इतकेच काय तर या व्हिडीओला ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या तरूणाने लोकांचे धन्यवाद मानले आहेत. म्हणाला की, तो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. मोठ्या मुश्किलीने तो रोज १६ डॉलर म्हणजे ११६३ रूपये कमावू शकतो.
 

Web Title: Man slept for 7 hours make 11 lakh rupees with one video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.