Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:55 IST2025-11-11T15:53:45+5:302025-11-11T15:55:01+5:30
लोक व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी काहीही करण्यास तयार असतात. रील्सने लोकांना वेड लावलं आहे.

Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
आजकाल सोशल मीडियावर विविध व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. लोक व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी काहीही करण्यास तयार असतात. रील्सने लोकांना वेड लावलं आहे. काही जण रील्सपायी स्वत:चा जीव धोक्यात घालतात, तर काही वाटेल ते करतात. रील्स आणि व्हायरल व्हिडिओमध्ये दररोज विचित्र ट्रेंड उदयास येत आहेत आणि लोकांमध्ये याचीच क्रेझ पाहायला मिळते.
असाच एक धक्कादायक एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एक दीवाने की दिवानियात' चित्रपटाच्या टायटल साँगवर रील बनवत आहे. सुरुवातीला सर्वकाही सामान्य वाटतं, परंतु जसा व्हिडीओ पुढे जातो तेव्हा दृश्य पाहून धक्काच बसतो.
व्हिडीओमध्ये, हा व्यक्ती गरम तव्यावर बसलेला दिसतो. तो कॅमेऱ्याकडे पाहतो आणि हसतो, जणू काही काहीच घडलेच नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यावर गरम तव्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. यावर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
एका युजरने व्हिडीओ पाहून "आता लोक व्ह्यूजसाठी काहीही करतील, उद्या ते आगीत उडी देखील मारतील" असं म्हटलं आहे. काहींनी हा वेडेपणा, बोगसपणा असल्याचं म्हणत कपलवर जोरदार टीका केली आहे. तर काही लोक हा "एआय-जनरेटेड व्हिडीओ" असल्याचं देखील म्हणत आहेत. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.