काय सांगता राव! पठ्ठ्याला शेतात सापडली 'भली मोठी' शेंग; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By manali.bagul | Published: October 23, 2020 04:22 PM2020-10-23T16:22:14+5:302020-10-23T16:23:19+5:30

Viral News In Marathi : अनेकांना ही शेंग खोटी (fake) वाटू शकते. असं मजेशीर कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे.

Man shared a giant petai picture video goes viral 46 | काय सांगता राव! पठ्ठ्याला शेतात सापडली 'भली मोठी' शेंग; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

काय सांगता राव! पठ्ठ्याला शेतात सापडली 'भली मोठी' शेंग; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Next

सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या शेंगेचा फोटो व्हायरल होत आहे. ही  भलीमोठी शेंग पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. या विशालकाय शेंगेचा फोटो पाहून अनेक सोशल मीडिया युजर्स बुचकळ्यात पडले आहेत. इतकी मोठी शेंग तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. या हिरव्यागार शेंगेच्या फोटोंसह व्हिडीओ सुद्धा शेअर करण्यात आला आहे. 

सोशल मीडिया युजर Kavy Azman याने हे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले असून XXXL आकाराची शेंग सापडली आहे. अनेकांना ही शेंग खोटी (fake) वाटू शकते. असं मजेशीर कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे. एका २३ वर्षीय मुलाला शेतात ही भलीमोठी शेंग सापडली आहे. सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ३३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या पोस्टला मिळाले आहेत. १६ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. 

औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली काश्मिर सारखी सफरचंद

एका खास प्रकारचे सफरचंद बिहारमधील औरंगाबादच्या शेतकऱ्याने पिकवून चांगले उत्पन्न घेतलं आहे. अमरेश कुमार सिंह हे औरंगाबादच्या कर्महीड गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी सफरसंदाच्या खास प्रजातींची शेती आपल्या २ कठ्ठा जमिनीवर करायला सुरूवात केली आहे. डिसेंबरमध्ये त्यांनी हरमन ९९ सफरचंदाची झाडं लावली होती. आता ही झाडं मोठी होऊन त्या झाडांवर फळंसुद्धा आली आहे. त्यांनी सांगितले होते की, एकदा झाडावरची सफरचंद तोडली होती. आता प्रोत्साहित होऊन उत्पन्न अधिक वाढवलं आहे. या सफरचंदाची किंमतही जास्त आहे. या प्रकारच्या सफरचंदाची शेती करून चांगले उत्पन्न घेता येऊ शकतं. कारण बाजारात मागणीही वाढत आहे. मास्क लावला नाही म्हणून या बाईला विमानातून हाकललं, अन् रागाच्या भरात तिनं काय केलं पाहा....

या सफरचंदाच्या पीकांना हरमन ९९ असं नाव देण्यात आलं आहे. हरमन ९९ हे गरम वातावरणातही सहज पिकवलं जाऊ शकतं. अंगणात किंवा बगिच्यात हे झाडं लावता येतं. त्यांनी सांगितले की, आपला जिल्हा आणि बिहारच्या मातीत हे पीक सहज घेता येऊ शकतं. अमरेश कुमार एक सुशिक्षित शेतकरी आहेत. त्यांनी शेतीमागचं तंत्र आणि विज्ञान समजून घेऊन पीक घ्यायला सुरूवात केली. त्यांनी सांगितले की, या प्रकारच्या सफरचंदाच्या शोध १९९९ मध्ये लागल्यानंतर हरमन शर्मा या तज्ज्ञाने २००१ मध्ये पहिलं पीक लावलं.त्यानंतर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत या प्रकारच्या सफरचंदाची शेती करायला सुरूवात झाली. वाह, नशीब चमकलं! मासेमाराच्या गळाला लागला ७५० किलोंचा दुर्मिळ 'मंटा-रे' मासा, पाहा फोटो

Web Title: Man shared a giant petai picture video goes viral 46

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.