मास्क लावला नाही म्हणून या बाईला विमानातून हाकललं, अन् रागाच्या भरात तिनं काय केलं पाहा....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 04:35 PM2020-10-22T16:35:03+5:302020-10-22T16:35:50+5:30

Viral Video Marathi : एका महिलेनं मास्क लावला नाही म्हणून विमानातील कर्मचारी या महिलेला बाहेर काढत आहेत, बाहेर काढलं म्हणून ही बाई रागाने अपशब्द वापरते.

Woman reaction on being asked to deplane for refusing to wear a mask is viral | मास्क लावला नाही म्हणून या बाईला विमानातून हाकललं, अन् रागाच्या भरात तिनं काय केलं पाहा....

मास्क लावला नाही म्हणून या बाईला विमानातून हाकललं, अन् रागाच्या भरात तिनं काय केलं पाहा....

Next

बेलफास्ट: उच्च शिक्षित लोक समजदार असतील असं अजिबात नाही. याचा प्रत्यय येईल अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर झाले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका महिलेनं मास्क लावला नाही म्हणून विमानातील कर्मचारी या महिलेला बाहेर काढत आहेत, बाहेर काढलं म्हणून ही बाई रागाने अपशब्द वापरते.

व्हिडीओ पाहताना तुम्हाला  दिसून येईल ही बाई मुद्दाम इतरांच्या अंगावर खोकते आणि थुंकण्याचा प्रयत्न करते. या महिलेचे असभ्य वर्तन पाहून विमानातील इतर प्रवाश्यांनाही या महिलेची किळस येत असावी.  खोकता खोकता ही बाई सगळे मरायला हवेत असंही म्हणते.  ही घटना उत्तर आयलँडची राजधानी बेलफास्टची आहे.  

सदर महिला ही बेलफास्ट आंतराराष्ट्रीय विमानतळावरून एडीनबर्ग येथे जात असलेल्या विमानात बसली. कर्मचाऱ्यांनी मास्क लावण्याची विनंती केल्यास या महिलेने मास्क लावण्यास नकार दिला आणि रागात मोठ्याने ओरडू लागली. या बाईचं विचित्र बोलणं अनेक प्रवाश्यांनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतलं. Video : बापरे! मासे पकडण्यासाठी नदीत टाकलं जाळं, गळाला लागली मगर, अन् मग.....

ही बाई अपशब्द बोलत विमानाच्या बाहेर पडत असताना इतर क्रू मेंमरही या बाईची अरेरावी पाहत होते. आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक केलं आहे. तर २ हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. ''मला माहीत आहे ,सगळे मरतील'' अशा आशयाचे शब्द ही बाई विमानातून बाहेर पडताना उच्चारत होती. स्वदेशी लसीची शेवटची चाचणी पुढच्या महिन्यात सुरू होणार, फेब्रुवारीत Covaxin येणार?

Web Title: Woman reaction on being asked to deplane for refusing to wear a mask is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.