VIDEO : पठ्ठ्याने काही विचार न करता सिंहाच्या पिंजऱ्यात टाकला हात, मग जे झालं ते पाहून बसणार नाही विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:41 IST2022-02-02T16:36:24+5:302022-02-02T16:41:30+5:30
Lion Attack Viral Video : हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. या व्यक्तीला जास्तीचा शहाणपणा कसा नडला यावरून असं काही करू नये याचा बोध मिळतो.

VIDEO : पठ्ठ्याने काही विचार न करता सिंहाच्या पिंजऱ्यात टाकला हात, मग जे झालं ते पाहून बसणार नाही विश्वास!
सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका प्राणी संग्रहालयात पिंजऱ्यात बंद असलेल्या एका सिंहासोबत मस्ती करणं एका व्यक्तीला महागात पडलं. जसं की, तुम्ही व्हिडीओत बघू शकता या व्यक्तीने कशाचाही विचार न करता पिंजऱ्यात हात टाकला (Lion Attack Viral Video) आणि नंतर पुढे जे झालं ते बघून धडकीच भरेल. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. या व्यक्तीला जास्तीचा शहाणपणा कसा नडला यावरून असं काही करू नये याचा बोध मिळतो.
सिंहाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सेनेगल पार्क हेन झूमधील सांगितली जात आहे. सिंहाच्या डरकाळीने जंगलातील अनेक खतरनाक प्राणी घाबरतात. पण या व्यक्तीला चांगलाच धडा मिळाला. सिंहाच्या हमल्याचा हा काही पहिला व्हिडीओ नाही. याआधीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत तुम्ही पिंजऱ्यात बंद सिंहाने कशाप्रकारे व्यक्तीचा हात जबड्यात पकडला हे बघायला मिळतं. सिंहाने हात तोंडात धरल्यावर ही व्यक्ती जोरजोरात ओरडू लागते.
ही व्यक्ती हात सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. पण त्याला लगेच यश मिळत नाही. तेच आजूबाजूचे लोक दगड मारून सिंहाचा लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात. पण सिंह काही त्याचा हात सोडत नाही. पण त्यानंतर हृदयाचे ठोके आणखी वाढतात. काही वेळाने सिंह या व्यक्तीचा हात सोडतो.
हा व्हिडीओ यूट्यूबवर Everything In Real Life TV नावाच्या चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ५० हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलंय. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक हैराण झाले आहेत. तर अनेकजण मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने गमतीने लिहिलं की, या धड्यानंतर ही व्यक्ती आता आयुष्यभर सोशल डिस्टंसिंगचं पालन करेल.
हे पण वाचा :
'अरे बिअरने काय नाय होत रे' असं म्हणणाऱ्यांनी एकदा हे वाचाच!