ती ट्रेन चालवत आली अन् उतरताच त्याने प्रपोज केले, ही लव्हस्टोरी बघुन तुम्हीही व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 18:36 IST2021-10-24T18:36:05+5:302021-10-24T18:36:19+5:30

आजपर्यंत तुम्ही प्रपोज करण्याचे अनेक मार्ग पाहिले असतील किंवा ऐकले असतील. अनेक वेळा लोक आपले प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करतात. हे सोशल मीडियापासून इतर प्लॅटफॉर्मवरही खूप गाजतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

man proposes train driver girlfriend video goes viral | ती ट्रेन चालवत आली अन् उतरताच त्याने प्रपोज केले, ही लव्हस्टोरी बघुन तुम्हीही व्हाल भावुक

ती ट्रेन चालवत आली अन् उतरताच त्याने प्रपोज केले, ही लव्हस्टोरी बघुन तुम्हीही व्हाल भावुक

आजपर्यंत तुम्ही प्रपोज करण्याचे अनेक मार्ग पाहिले असतील किंवा ऐकले असतील. अनेक वेळा लोक आपले प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करतात. हे सोशल मीडियापासून इतर प्लॅटफॉर्मवरही खूप गाजतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बराच जुना झाला असला तरी पुन्हा एकदा हा व्हिडिओ चर्चेत आहे. त्यामुळेच तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

हे प्रकरण आयर्लंडची राजधानी डब्लिनचे आहे.  कॉनर ओ’सुलिव्हन आणि पॉला कार्बो झिया दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पॉला कार्बो झिया ही एक लोको पायलट आहे. पॉला कार्बो झियाला प्रपोज करण्यासाठी कॉनर ओ’सुलिव्हनने एक अनोखी पद्धत वापरली.

व्हिडीओमध्ये दिसतं की, पॉला ही ट्रेन चालवत स्टेशनपर्यंत पोहचते, स्टेशनवर ट्रेन थांबवल्यानंतर तिला तिचा प्रियकर कॉर्नर बाहेर फुलांच्या गुच्छासह बाहेर उभा असल्याचं दिसतं. जशी पॉला बाहेर पडते, तसा कॉर्नर तिच्यासमोर गुडघे टेकतो आणि तिला फुलांचा गुलदस्ता आणि अंगठी देऊन प्रपोज करतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील खूप पसंत केला जात आहे आणि युजर्स हा व्हिडिओ पसंत करत आहेत आणि शेअर करत आहेत, मग तुम्हीही हा व्हिडिओ पाहा, प्रपोज करण्याची ही पद्धत तुम्हालाही आवडेल.

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट केली की, ‘काश कोणीतरी मला असं प्रपोज केले असतं’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मला वाटत नाही की आजच्या काळात असे प्रेम असेल’ याशिवाय सोशल मीडिया युजर्स त्यांच्या लाईक आणि कमेंट्ससह व्हिडिओवर भरपूर प्रेम व्यक्त करत आहेत.

 

 

Web Title: man proposes train driver girlfriend video goes viral