Viral Video: सापाशी मस्ती अंगाशी आली, सापाने असा केला वार की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 17:59 IST2022-09-12T17:57:39+5:302022-09-12T17:59:24+5:30
अनेकदा काही व्यक्ती सापासोबत जीवघेणे खेळ करत असते असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पाहुया नेमका काय आहे हा व्हिडिओ...

Viral Video: सापाशी मस्ती अंगाशी आली, सापाने असा केला वार की...
इंटरनेटवर अनेक व्हिडिओजचा धुमाकुळ असतो. त्यात प्राण्यांचे व्हिडिओ तर विशेष पसंतीस पडतात. या व्हिडिओमध्ये सापाचे व्हिडिओ प्रेक्षकांना विशेष आवडतात. सापाचे व्हिडिओज अत्यंत खरतरनाक असतात. यामध्ये अनेकदा काही व्यक्ती सापासोबत जीवघेणे खेळ करत असते असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पाहुया नेमका काय आहे हा व्हिडिओ...
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की ही व्यक्ती सापाला कसं अंगाखांद्यावर खेळवत आहे. सापाला ती पकडण्याचा प्रयत्न करते पण साप निसटतो मग अलगद ती व्यक्ती सापाला त्याच्या हातात घेते. पण तेव्हा ती पुर्ण जमिनीवर झोपलेली आहे. ती सापासोबत ज्या पद्धतीने वागते आहे त्यावरुन ती सापाशी सहज खेळु शकते असं वाटतंय पण सापाला जर राग आला असता तर या व्यक्तीची काही खैर नव्हती.
world_of_snakes_या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि व्हिव्ज मिळत आहेत.