This man is playing the keyboard and dancing at the same time video goes viral | ये बजाओ! की-बोर्ड वाजवणारा असा काही बिनधास्त नाचला की व्हिडीओ झाला व्हायरल....

ये बजाओ! की-बोर्ड वाजवणारा असा काही बिनधास्त नाचला की व्हिडीओ झाला व्हायरल....

आपल्या स्टेपबाबत जग काय विचार करतं याचा विचार न करता डान्स करणारीच व्यक्ती जबरदस्त डान्स करू शकते. आता नाचायचंच आहे तर दुसऱ्याला बघून का नाचायचं. नाचायचं स्वत:च्या आनंदासाठी आणि विचार करायचा दुसऱ्यांचा याला काही अर्थ नाही. सध्या एक बारी व्हिडीओ समोर आलाय. यात की-बोर्ड वाजवणाऱ्या कलाकाराने वाचवण्यासोबतच धमाकेदार डान्सही केला आहे. दोन्ही कामं त्याने अशी केली की, लोक त्याला बघतच राहिले.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ कुठला आहे हे काही समजू शकलेलं नाही. पण त्याची डान्स स्टाइल लोकांना भारी वाटली. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती कशाप्रकारे एन्जॉय करत की-बोर्डही वाजवतो आहे आणि सोबतच डान्सही करतो आहे. त्याची डान्स स्टेपही अनेकांना भावली आहे.  

सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या टॅलेंटच्या लोकांचे व्हिडीओ शेअर केले जातात. पण त्यातील मोजकेच व्हिडीओ व्हायरल होतात आणि लोकांना इतके आवडतात. हा व्हिडीओ त्यापैकीच एक आहे. ज्यातील व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्हीही एकदा त्याच्यासारखा बिनधास्त डान्स करून बघा किती आनंद मिळतो.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This man is playing the keyboard and dancing at the same time video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.