बाबो! सगळं सोडलं अन् माणसाच्या शरीराचा बनवला केक; फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 18:29 IST2021-02-18T18:24:00+5:302021-02-18T18:29:38+5:30
bizarre cake pics goes viral : एका ट्विटर युजरनं असा फोटो शेअर केला आहे. जो फोटो पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

बाबो! सगळं सोडलं अन् माणसाच्या शरीराचा बनवला केक; फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल
आजकाल केकचा क्रेझ इतका वाढला आहे. लग्न असो, साखरपुडा, वाढदिवस किंवा कोणताही सण अनेकजण केक कापून किंवा खाऊन आनंद साजरा करतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी सोशल मीडियावरून केक बनवण्याचे वेगवेगळे फंडे शिकून घेतले आणि केक बनवायला सुरूवात केली. एका ट्विटर युजरनं असा फोटो शेअर केला आहे. जो फोटो पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.
THIS IS A CAKE. pic.twitter.com/9h9pXiYHDG
— Horror4Kids (@horror4kids) February 16, 2021
या फोटोमध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक माणूस झोपलेल्या अवस्थेत दिसून येईल. रुग्णालयाच्या बेडवर काही सामान पडलेलं आहे. पाहताना असं वाटेल की शरीराचे भागच जणूकाही कापून ठेवले आहेत. पण हे कोणत्याही माणसाचं शरीर नाही तर एक केक आहे. हा फोटो कुठे काढण्यात आला आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही. या फोटोतील हातांची संख्या आहे तरी किती? पाहताच क्षणी लोक गोंधळात पडले, बघा तुम्हाला जमतंय का
THIS IS A CAKE. pic.twitter.com/9h9pXiYHDG
— Horror4Kids (@horror4kids) February 16, 2021
हा फोटो पाहून काहीजण घाबरले आहेत तर काही जणांनी गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर खराखूरा माणूस झोपलाय असं तुम्हाला वाटू शकतं. आतापर्यंत ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले असून ८०० पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो कुठला आहे, कोणी असा केक तयार केला आहे. याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. Cute baby cow video: 'त्या'ने घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध, दिसायला आहे इतकी सुंदर की...