Man lifts the horse on the shoulder : बाप रे बाप! घोड्याला एका खांद्यावर उचलून धाव धाव धावतोय पठ्ठ्या; समोर आला Shocking Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 12:54 IST2021-03-06T12:27:21+5:302021-03-06T12:54:57+5:30
Man lifts the horse on the shoulder : असा एक माणूस आहे जो आपल्या खांद्यावर फक्त घोड्यांना उचलत नाही (Man lifts the horse on the shoulder) तर त्यांच्यासह धावतो सुद्धा. तुम्हाला वाचून खरं वाटणार नाही, पण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा माणूस खरंच घोड्याला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात आहे.

Man lifts the horse on the shoulder : बाप रे बाप! घोड्याला एका खांद्यावर उचलून धाव धाव धावतोय पठ्ठ्या; समोर आला Shocking Video
तुम्ही लोकांना नेहमीच घोड्यावर बसलेले पाहिले असेल, पण तुम्ही कधी एखादा माणसाला खांद्यावर घोड्याला उचलताना पाहिलं नसेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा एक माणूस आहे जो आपल्या खांद्यावर फक्त घोड्यांना उचलत नाही (Man lifts the horse on the shoulder) तर त्यांच्यासह धावतो सुद्धा. तुम्हाला वाचून खरं वाटणार नाही, पण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा माणूस घोड्याला खरंच आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात आहे.
हा माणूस युक्रेनचा रहिवासी असून याचे नाव दिमित्री खलादजी आहे. जगातील सगळ्यात जास्त शक्तीशाली माणसांमध्ये यांची माणसाची गणती होते. हा माणूस इतका ताकदवान आहे की, एकत्र ६ लोकांनाही उचलू शकतो. दिमित्री यांचे इंस्टाग्राम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्यांनी खरोखरच हा विक्रम केला आहे. यांचे हात खूप इतके मजबूत आहेत त्यामळे फक्त हातानं दणका मारून ते खिळे ठोकू शकतात. २९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव
दिमित्रीनं यांनी आधी सर्कसमध्ये काम केले होते. त्यावेळी ते आपल्या दातांनी लोखंडाचे रॉड तोडायचे. इंस्टाग्रामच्या व्हिडीओजमध्ये तुम्हाला या माणसाच्या वेगवेगळ्या करामती पाहायला मिळतील.आपल्या एका हातानं १५२ किलोंचं वजन उचलण्यासाठीही दिमित्री सक्षम आहेत.
एकदा किंवा दोनदा नाही तर तब्बल ६० पेक्षा जास्तवेळा दिमित्री याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले आहे. सोशल मीडियावर दिमित्री यांचे व्हिडीओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. लोकांनी यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप...