Russian bodybuilder who injected petrol jelly in his hands is suffering from giant biceps pain | अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप...

अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप...

रशियात राहणाऱ्या २४ वर्षीय बॉडीबिल्डर किरील टेरेशीनने पेट्रोलिअम जेलीचं इंजेक्शन घेऊन स्वत:ला सुपरमॅन बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण असं करणं त्याला चांगलंच महागात पडलं. किरीलची एक सर्जरी झाली आहे. मात्र, अजूनही काही सर्जरी बाकी आहेत आणि कोरोना महामारीमुळे त्याची सर्जरी टाळली जात आहे. किरील आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहे आणि एकेकाळी बेजबाबदार वागणाऱ्या या व्यक्तीला आता कळालं आहे की, त्याने किती मोठी चूक केली आहे. 

हा तरूण म्हणाला की, त्याने तो २० वर्षांचा असतानापासून हातात पेट्रोलिअम जेलीचे इंजेक्शन घेणे सुरू केले होते. त्यावेळी मी फार बेजबाबदार वागत होतो आणि मी याच्या परिणांमांकडे अजिबात लक्ष दिलं नव्हतं. मला हे शरीराच्या इतर भागातही घ्यायचं होतं. पण आधी मला माझ्या बायसेप्सवर या परिणाम बघायला होता. (हे पण वाचा : बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...)

तो पुढे म्हणाला की, जेव्हा माझ्या हातांमध्ये प्रॉब्लेम होऊ लागला होता तेव्हा मला जाणीव झाली की, याचा मी शरीरावर आता कुठेही वापर करू नये. दरम्यान किरीलच्या या स्थितीबाबत रशियाचा फुटबॉल स्टारची पत्नी एलानाला समजले होते. ती प्लास्टिक सर्जरी करून नुकसान झालेल्या लोकांची मदत करत होती. तिनेच किरीलच्या सर्जरीतही मदत केली होती. (हे पण वाचा : २९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव)

किरीलची एक सर्जरी गेल्यावर्षी झाली आहे. ज्यात त्याच्या हातातून सिंथोल ऑइल आणि डेड मसल्स टिशूज काढले होते. या बॉडी बिल्डरचे डोळे २४ इंचाचे होते. पण यावर प्रयोग केल्याने त्याच्या हातात वेदना होत होत्या आणि त्याला तापही येत होता. त्याला याचा त्रास होऊ लागला होता. हा तरूण एमएमए फाइटमध्ये केवळ तीन मिनिटांमध्ये बाहेर झाला होता.

किरीलचे सर्जन दिमित्री मेल्नीकोव म्हणाले होते की, जर त्याची सर्जरी झाली नाही तर त्याचा जीवही जाऊ शकतो. दिमित्री म्हणाला की, किरीलने त्याच्यावर जे प्रयोग केले. तसेच इतर लोक शरीराचे इतर भाग प्रभावी करण्यासाठी करतात. पण मला त्या सर्वांना सांगायचं आहे की, हे फारच घातक आहे आणि त्यांनी असे प्रयोग अजिबात करू नये.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Russian bodybuilder who injected petrol jelly in his hands is suffering from giant biceps pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.