VIDEO : कर्म! कुत्र्याला मारत होता हा माणूस, गायीने त्याला उचलून आपटलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 18:29 IST2021-11-01T18:27:01+5:302021-11-01T18:29:46+5:30
Viral Video : एक व्यक्ती कुत्र्यावर अत्याचार करत आहे. जेव्हा या मुक्या प्राण्याची करण्यासाठी कुणी आलं नाही तर एक गाय कुत्र्याच्या मदतीसाठी धावून आली.

VIDEO : कर्म! कुत्र्याला मारत होता हा माणूस, गायीने त्याला उचलून आपटलं...
Viral Video : तुम्ही जसं कर्म करता तसं तुम्हाला फळ मिळत असतं. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, तुमच्या कर्माचं फळ तेव्हाच्या तेव्हा मिळतं. याचं ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ एका IFS अधिकाऱ्याने शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती कुत्र्यावर अत्याचार करत आहे. जेव्हा या मुक्या प्राण्याची करण्यासाठी कुणी आलं नाही तर एक गाय कुत्र्याच्या मदतीसाठी धावून आली.
हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांता नंदाने ट्विटरवर शेअऱ केला आहे. आणि लिहिलं आहे की, 'कर्मा'. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ७२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर १६ हजार लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. शेकडो लोकांनी या कमेंट्सही केल्या आहेत.
Karma 🙏🙏 pic.twitter.com/AzduZTqXH6
— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 31, 2021
या व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती कुत्र्याला कानाला धरून हवेत वर उचलत आहे. तो इतक्या जोराने कान खेचतो की, मुका जीव जोरात किंचाळतो. जणू तो स्वत:ला वाचवण्यासाठी मदतीसाठी आवाज देत आहे. जेव्हा कुणी मनुष्य त्याच्या मदतीला आलं नाही तर एक धावत आली. तिने त्या व्यक्तीवर हल्ला केला, ज्यामुळे तो जमिनीवर पडला आणि कुत्रा स्वतंत्र झाला.