भिंतीमागून येत होता 'हिस्स-हिस्स' असा आवाज, पाडून पाहिली तर दिसलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:47 IST2024-12-26T15:25:09+5:302024-12-26T15:47:02+5:30

Cobra Family Video : काही लोक असेही असतात जे सापांना मारण्याऐवजी त्यांना पकडणाऱ्यांना बोलवतात आणि साप जंगलात सोडून देतात.

Man found the family of cobras behind the house wall watch shocking video | भिंतीमागून येत होता 'हिस्स-हिस्स' असा आवाज, पाडून पाहिली तर दिसलं असं काही...

भिंतीमागून येत होता 'हिस्स-हिस्स' असा आवाज, पाडून पाहिली तर दिसलं असं काही...

Cobra Family Video : जगभरात एकापेक्षा एक खतरनाक साप आहेत. सापांचे अनेक धक्कादायक किंवा रेस्क्यूचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जर साप समोर आला तर लोक घामाघुम होतात आणि पळून जातात. काही लोक सापाला ठार मारतात. मात्र, साप हे आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्वाचे असतात. मात्र, काही लोक असेही असतात जे सापांना मारण्याऐवजी त्यांना पकडणाऱ्यांना बोलवतात आणि साप जंगलात सोडून देतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत बघू शकता की, एका व्यक्तीच्या घराच्या भिंतीच्या मागून हिस्स-हिस्स असा आवाज येत होता. अशात त्या व्यक्तीनं भींत तोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी व्यक्तीने सर्पमित्रालाही बोलवलं. त्यानंतर व्यक्ती भींत पाडण्यास सुरू केली. भींत पडल्यावर अचानक समोर कोब्रा सापाची पूर्ण फॅमिलीच दिसते. दोन भिंतीच्या मधे कोब्रा लपून बसले होते. त्यांचाच आवाज घरात येत होता. त्यानंतर सर्पमित्राने सगळे साप पकडले आणि जंगलात सोडून दिले.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ आशिष नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. या यूजरच्या प्रोफाइलवर सापांसंबंधी अनेक व्हिडीओ आहेत. त्याच्या प्रोफाइलवरील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी शेअर आणि लाइकही केले आहेत.

Web Title: Man found the family of cobras behind the house wall watch shocking video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.