भाऊ गेला स्टंट करायला आणि तोंडावर आपटला, पुन्हा स्टंट करायला जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:15 IST2021-08-16T19:09:32+5:302021-08-16T19:15:58+5:30
काही व्हिडीओ हे मुद्दाम प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपलोड करण्यात येतात. मात्र प्रसिद्धी मिळवण्याच्या वेडापाई काही लोकांची चांगलीच फजिती होते.

भाऊ गेला स्टंट करायला आणि तोंडावर आपटला, पुन्हा स्टंट करायला जाणार नाही
सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे मुद्दाम प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपलोड करण्यात येतात. मात्र प्रसिद्धी मिळवण्याच्या वेडापाई काही लोकांची चांगलीच फजिती होते. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा माणसाच्या अशाच एका करामतीचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत असून खळखळून हसत आहेत.
व्हिडीओमध्ये दोण माणसं बागेच्या कुंपणाच्या भोवती उभे आहेत. यातील एक माणूस स्टंट करण्याच्या बेतात आहे. त्याने बाजूच्या कुंपणावर थेट उडी घेतलीय. तसेच एका क्षणात तो जमिनीवर परत उतरला आहे.
या माणसाचा थरारक स्टंट पाहून व्हिडीओतील दुसऱ्या माणसालाही स्टंट करण्याची इच्छा झालीय. त्यानेही पहिल्या माणसासारखा स्टंट करण्याचा प्रयत्न केलाय. त्याने बागेच्या कुंपणावर उडी घेतली आहे. उडी घेण्यात तो यशस्वी ठरलाय. मात्र, पुन्हा परत जमिनीवर येताना तो चांगलाच गोंधळा आहे. खाली उतरताना त्याचा तोल गेल्यामुळे तो खाली अदळला आहे. हा सर्व प्रकार पाहून सगळेच हसायला लागले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. तसेच काही नेटकरी या व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर comedy_videos9752 या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.