गटारात घर बांधुन स्ट्रॉने पितोय गटाराचं पाणी, व्हिडिओ पाहुन वाटेल घाण पण कारण वाचून येईल दया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:26 IST2021-09-05T13:20:51+5:302021-09-05T13:26:34+5:30
एका व्यक्तीनं चक्क गटारावर आपलं घर बांधलंय आहे. याचा व्हिडीओच सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हे सर्व इतक्यावरच थांबलं असतं तरीही ठीक पण त्यातही कहर म्हणजे तो पाणीही त्या गटारातलच पितो.

गटारात घर बांधुन स्ट्रॉने पितोय गटाराचं पाणी, व्हिडिओ पाहुन वाटेल घाण पण कारण वाचून येईल दया
लोकं जमिनीवर घर बांधतात. काहीजणांना आपलं घर चंद्रावर, मंगळावर असांव असंही वाटतं. पण एका व्यक्तीनं अशा ठिकाणी घर बांधलंय ज्याची कल्पना तर सोडाच पण फक्त क्षणापुरता विचारही अंगावर शिसारी आणेल. या व्यक्तीनं चक्क गटारावर आपलं घर बांधलंय आहे. याचा व्हिडीओच सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हे सर्व इतक्यावरच थांबलं असतं तरीही ठीक पण त्यातही कहर म्हणजे तो पाणीही त्या गटारातलच पितो.
हा व्हिडीओ 'फनी रील्स व्हिडीओज' या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीनं एका गटारावर आपला घरं बांधलं आहे. गटारावरत खाट टाकून तो मस्त विश्रांती घेतोय. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत जसं, चप्पल, कपडे आणि इतर साहित्य. ती व्यक्ती स्ट्रॉ वापरून त्याच गटारातील पाणी देखील पितेय.
या व्हिडिओला आस्था गिल आणि बादशाहाचं 'पानी पानी हो गई' हे गाणं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून देण्यात आलंय. या व्हिडिओला १७ हजाराहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला आहे. नेटकरी या व्हिडिओची मजा घेत यातील व्यक्तीची जोरदार खिल्ली उडवतायत.