3 हजार कोटींची संपत्ती सोडून निवडला आध्यात्माचा मार्ग; कुंभमेळ्यात 'बिझनेसमन बाबा'ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:59 IST2025-02-13T15:59:06+5:302025-02-13T15:59:06+5:30
Mahakumbh Viral Business Baba: या बिझनेस बाबाची कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

3 हजार कोटींची संपत्ती सोडून निवडला आध्यात्माचा मार्ग; कुंभमेळ्यात 'बिझनेसमन बाबा'ची चर्चा
Mahakumbh Viral Business Baba:उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या महाकुंभासाठी देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येत आहेत. याशिवाय अनेक संत आणि साधूबाबा पाहायला मिळाले आहेत. मग आयआयटी बाबा असो, काट्यावाले बाबा असो, रुद्राक्ष बाबा असो किंवा नागा साधू असो...अनेक बाबांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
नवीन बाबाची चर्चा
आता कुंभमेळ्यातून एक नवीन बाबा सोशल मीडियावर चर्चेत आला असून, त्याचे नाव बिझनेसमन बाबा आहे. हा बाबा व्हायरल होण्याचे कारण म्हणजे, बाबाने 3 हजार कोटींची संपत्ती आणि आलिशाय आयुष्य मागे टाकून अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. त्यामुळेच या बिझनेस बाबाची कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
संपत्ती समाधान देऊ शकत नाही...
या बाबांनी सांगितले की, विलासी आणि सुखसोयींनी भरलेले जीवन जगल्यानंतर त्यांना समजले की, संपत्ती माणसाला समाधान देऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. बिझनेस बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @daily_over_dose नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. यावर लोकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.