lungi man : बाबो! आधी सापाला उचललं अन् मग लुंगीत सोडलं; नंतर घडलं असं काही......

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:22 PM2021-05-14T20:22:17+5:302021-05-14T20:30:26+5:30

lungi man play with snake : या व्हिडीओमध्ये एक माणूस सापाला अगदीच निर्भयपणे हाताळतो आहे.

lungi man : lungi man play with snake and put it in his lungi video goes viral on social media | lungi man : बाबो! आधी सापाला उचललं अन् मग लुंगीत सोडलं; नंतर घडलं असं काही......

lungi man : बाबो! आधी सापाला उचललं अन् मग लुंगीत सोडलं; नंतर घडलं असं काही......

Next

साप म्हटलं सगळ्यात आधी अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर एका  सापाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. साप व्हिडीओ किंवा फोटोत पााहायला बरा वाटतो. पण समोर आल्यावर काय होईल याची कल्पनाही केली  जाऊ शकत नाही.  व्हायरल होत असलेल्या  या व्हिडीओमध्ये एक माणूस सापाला अगदीच निर्भयपणे हाताळतो आहे. (lungi man play with snake and put it in his lungi video goes viral on social media)

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीने या सापाच्या शेपटीला पकडलेले आहे. शेपटीला पकडल्यामुळे या सापाला काहीच करायला जमत नाही. मात्र, सापाने झेप घेताच हा माणूस स्वत:ला सापापासून वाचवतोय. बाजूला लांब काही माणसे उभी असल्याचे दिसते आहे.

या माणासाला सापाला हाताळताना पाहून सगळेचजण अवाक् झाले आहेत.  या माणसानं सापाला लुंगीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  साप लुंगीमध्ये टाकल्यानंतर बाजूला उभ्या राहिलेले लोक आश्चर्यचकीत होऊन पाहतात.   कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

हा व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. लोकांनी अनेक गमतीदार कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत. की लुंगीचे अनेक उपयोग आहेत, असे  एका सोशल मीडिया युजरनं म्हटलयं तर अशा वेडेपणामुळे सर्पमित्राचा जीव जाऊ शकतो असं एकानं म्हटलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 8 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले  असून कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक

Web Title: lungi man : lungi man play with snake and put it in his lungi video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.