सुरु होतं लाईव्ह रिपोर्टिंग, अचानक तलावात बुडू लागली कार, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 15:55 IST2021-08-05T15:54:05+5:302021-08-05T15:55:02+5:30
काहीवेळा अशा काही घटना घडतात की घटनास्थळी जणून कॅमरा त्या घटना कैद करण्यासाठी तयारच असतो. अशीच एक चित्त थराराक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मुख्य म्हणजे ही घटना घडत असताना एक पत्रकार तिथे लाईव्ह रिपोर्टिंग करत होता. त्याच्याच चॅनेलच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

सुरु होतं लाईव्ह रिपोर्टिंग, अचानक तलावात बुडू लागली कार, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
काहीवेळा अशा काही घटना घडतात की घटनास्थळी जणून कॅमरा त्या घटना कैद करण्यासाठी तयारच असतो. अशीच एक चित्त थराराक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मुख्य म्हणजे ही घटना घडत असताना एक पत्रकार तिथे लाईव्ह रिपोर्टिंग करत होता. त्याच्याच चॅनेलच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
🇺🇸🇺🇸🇺🇸 pic.twitter.com/Uah0acNmeD
— Brian Floyd (@BrianMFloyd) August 4, 2021
तुम्ही व्हिडिओत बघु शकता की, एक रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत आहे. हळूहळू त्याच्यामागून एक कार हळूहळू सरकत पाण्यात पडते. हा रिपोर्टर सुरुवातीला बातमी देत असतो पण जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. त्याच्यासमोरच ती कार पाण्यात जाते. तो बाजूला होतो व कॅमेरामनला त्या कारवर कॅमेरा फोकस करायला सांगतो. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
फुटबॉल लेखक ब्रायन फ्लॉयड यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या रिपोर्टचं नाव जॅकोब इमर्सन (Jakob Emerson) असून ते WCIS या चॅनलचे रिपोर्टर आहेत. या क्षेत्रामध्ये बनवण्यात येणाऱ्या आणखी एका कृत्रिम तलावाची ते माहिती देत होते. या कारमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.