'मला नवऱ्याकडे जायचंय'; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 20:20 IST2021-02-12T20:10:05+5:302021-02-12T20:20:51+5:30
Trending Viral Video in Marathi : मला नवऱ्याकडे (Girl Crying For Husband) जायचं आहे. असं ती रडत आईला सांगते.

'मला नवऱ्याकडे जायचंय'; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पाहा व्हायरल व्हिडीओ
लहान मुलं नेहमीच कोणत्या ना कोणच्या कारणांसाठी आपल्या पालकांकडे हट्ट करतात. मागितलेली वस्तू घेऊन दिली नाही तर रडून रडून नुसता गोंधळ घालतात. सोशल मीडीयावर सध्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही चिमुरडी खेळणं, खाऊ किंवा वस्तूसाठी नाही तर नवऱ्यासाठी रडत आहे. आता तुम्ही विचार करत असाल नवरा म्हणजे काय? हे या चिमुरडीला माहीत तरी आहे का? माझा नवरा कुठे आहे, मला नवऱ्याकडे (Girl Crying For Husband) जायचं आहे. असं ती रडत आईला सांगते. या चिमुरडीच्या या क्युटनेसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोट पोट होऊन हसाल.
ये बच्चे भी ना... कौन समझाए इनको...@ipsvijrk@ipskabra@Chhattisgarh_36pic.twitter.com/ssrMxR81rY
— Vijay kumar (@vkvkmarwat) February 11, 2021
सोशल मीडिया युजर @vkvkmarwat ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी जमिनीवर निराश बसली आहे. ती रडताना दिसत आहे. तिची आई तिला याचं कारण विचारते. तेव्हा ती आपल्याला नवऱ्याकडे जायचं असल्याचं सांगते. चिमुरडी म्हणते मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे. तेव्हा तिची आई तिला विचारते कोण आहे तुझा नवरा तेव्हा ती मामा असं म्हणते. तिची आई तिला सांगते मामा तर मामीचा नवरा आहे. बाबो! भारतातल्या या मंदिरात एकाच दिवशी आलं एवढं दान; नोटा मोजता मोजता लोकांना फुटला घाम...
मुलीचा हा क्युटनेस आणि गोड चेहरा पाहून आणि सोशल मीडिया युजर्सना हसू अनावर झालं आहे. हा व्हिडीओ शेअर करतानादेखील ही मुलंसुद्धा ना... कोण समजावेल यांना असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हल्ली लहान मुलांना मोठं होण्याची घाई असल्याचं म्हटलं आहे. अनेक विनोदी कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले....