बाबो! भारतातल्या या मंदिरात एकाच दिवशी आलं एवढं दान; नोटा मोजता मोजता लोकांना फुटला घाम...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:35 PM2021-02-11T17:35:23+5:302021-02-11T17:53:22+5:30

Trending Viral News : बुधवारी या मंदिराला एवढी देणगी मिळाली की लोक रोख रकमेची मोजणी करता करता फार थकून गेले. 

Rajasthan Temple Got So Many Crores in Donation That People Got Tired of Counting Cash | बाबो! भारतातल्या या मंदिरात एकाच दिवशी आलं एवढं दान; नोटा मोजता मोजता लोकांना फुटला घाम...

बाबो! भारतातल्या या मंदिरात एकाच दिवशी आलं एवढं दान; नोटा मोजता मोजता लोकांना फुटला घाम...

Next

जेव्हा जेव्हा धार्मिक देणग्यांचा  (Donation) विचार केला जातो तेव्हा आपल्याला माहित आहे की भारतीयांचे अंतःकरण किती मोठे आहे. विश्वास आणि श्रद्धेच्या भावनेनं दररोज भारतीय देवळांमध्ये प्रचंड देणगी दिली जाते. राजस्थानातील (Rajasthan)  चित्तोडगढ जवळील श्री सांवलिया सेठ, मंदिर त्यापैकी एक आहे. बुधवारी या मंदिराला एवढी देणगी मिळाली की लोक रोख रकमेची मोजणी करता करता फार थकून गेले. 

विशेष म्हणजे बुधवारी श्री सांवलिया सेठ यांच्या दोन दिवसीय मासिक मेळ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीला दानपेटी उघडण्यात आली. जेव्हा दानपेटी उघडली तेव्हा त्यात सोन्या चांदींच्या दानाव्यतिरिक्त रोख रकमेचे मोठे ढीग मिळाले. डझनभर लोकांना नोटा मोजण्याचे काम करावे लागले, परंतु ही रक्कम इतकी होती की अखेर ते कंटाळले.  इंडिया. कॉमने याबाबत अधिक बातमी दिली आहे.

अखेर त्या दिवसाची मतमोजणी संपल्यानंतर मंदिराच्या संपूर्ण दानपेट्यांमध्ये ६ कोटी १७ लाख १२ हजार २०० रुपये  मिळाले. याशिवाय, देणगीच्या पेटीतून  ९१ ग्रॅम सोनं, २०० ग्रॅम चांदी देखील  मिळाली आहे. 

कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले.... 

उर्वरित नोटा आज मोजल्या जाणार आहेत. रोकड मोजणीत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी मंदिर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रतनकुमार स्वामी, जिल्हाधिकारी रतनकुमार स्वामी आणि मंदिर मंडळाचे अध्यक्ष कन्हैयादास वैष्णव व अन्य अधिकारी उपस्थित होते.  मानलं गड्या! नोकरी सोडली अन् युट्यूबची आयडीया घेऊन शेती केली, आता घेतोय लाखोंची कमाई

Web Title: Rajasthan Temple Got So Many Crores in Donation That People Got Tired of Counting Cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.