VIDEO : सिंहाचा फोटो काढता होता 'तो', मग जंगलाच्या राजाने केलं असं काही; बघा थरारक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:51 IST2021-11-02T15:51:41+5:302021-11-02T15:51:57+5:30
Social Viral Video : सिंहाचं नाव ऐकताच भंबेरी उडते. अशात जर आपल्याला दूरूनच सिंह दिसला तर आपण सुसाट वेगाने पळून जातो. पण एक व्यक्ती सिंहाजवळ जाऊन त्याचा फोटो काढत होता.

VIDEO : सिंहाचा फोटो काढता होता 'तो', मग जंगलाच्या राजाने केलं असं काही; बघा थरारक व्हिडीओ
Social Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ तर इतके क्यूट असतात की, जे पुन्हा पुन्हा बघण्याची इच्छा होते. तर काही व्हिडीओ हे हैराण करणारे असतात. अशातच सिंहाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण या व्हिडीओ एक व्यक्ती सिंहाचा फोटो काढत होता. पण त्यानंतर सिंहाने जे केलं ते पाहून थरकाप उडतो.
सिंहाचं नाव ऐकताच भंबेरी उडते. अशात जर आपल्याला दूरूनच सिंह दिसला तर आपण सुसाट वेगाने पळून जातो. पण एक व्यक्ती सिंहाजवळ जाऊन त्याचा फोटो काढत होता. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, आधी तर सिंहाची नजर या व्यक्तीवर गेली नव्हती. पण जशी त्याची नजर व्यक्तीवर गेली, मग तो रागाने डरकाळी फोडू लागला होता.
या व्यक्तीची हिंमत बघून भारी वाटत असलं तरी असं करणं कधी कधी महागात पडू शकतं. इथे मोठी दुर्घटना घडली असती. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यूटूयूबवर हा व्हिडीओ 'Maasai Sightings' नावाच्या अकाउंटवर शेअऱ करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.