भिंत ओलांडून सिंह रहिवासी भागात शिरला, महिलेवर हल्ला केला अन्..; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:23 IST2025-07-07T12:23:56+5:302025-07-07T12:23:56+5:30
Lion Video Viral: हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भिंत ओलांडून सिंह रहिवासी भागात शिरला, महिलेवर हल्ला केला अन्..; पाहा Video
Lion Viral Video: सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही अंगावर शहारे आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सिंह रहिवासी भागात एका महिला आणि मुलावर हल्ला करताना दिसत आहे. ही घटना पाकिस्तानातील लाहोर येथील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला काही लोक नेहमीप्रमाणे इकडे-तिकडे जाताना दिसत आहेत. यावेळी अचानक अचानक एक बाजूच्या भिंतीवरुन उडी मारून रस्त्यावर येतो. सिंहाला पाहून सर्वांचीच भांभेरी उडते. यानंतर तो सिंह धावत जाऊन एका महिलेवर हल्ला करतो, यामुळे ती जमिनीवर पडते. पण, सुदैवाने तो सिंह तिला काही न करता पळून जातो. त्या सिंहाच्या मागे एक माणूस धावतानाही दिसतो.
पाहा Video:-
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पाकिस्तानातील असून, तो सिंह पाळीव असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानात अनेकजण वाघ-सिंह अशाप्रकारचे हिंस्र प्राणी घरात पाळतात. तुम्ही अशाप्रकारचे अनेक व्हिडिओही पाहिले असतील. दरम्यान, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @wildtrails.in नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला असून, वेगाने व्हायरल होत आहे. यावर नेटीझन्स विविध प्रतिक्रियाही देत आहेत.