Video: बिबट्याची शिकार करायला सिंह जवळ गेला अन् सुरू झाली झुंज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:34 IST2022-11-24T13:33:28+5:302022-11-24T13:34:01+5:30

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय

lion suddenly attacks leopard for hunt wild animals fight in jungle forest Video see what happened next | Video: बिबट्याची शिकार करायला सिंह जवळ गेला अन् सुरू झाली झुंज...

Video: बिबट्याची शिकार करायला सिंह जवळ गेला अन् सुरू झाली झुंज...

Lion Leopard Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. तुम्हीही सोशल मीडिया अकाउंटवर एक्टिव्ह असाल तर तुम्ही अनेक वेळा असे काही व्हिडिओ पाहिले असतील जे तुम्हाला खूप हसवतात. काही वेळा तर ठराविक व्हिडिओ इतके मजेदार वाटतात की, ते नवीन व्हिडिओ नसले तरीही पुन्हा-पुन्हा पाहावेसे वाटतात. याशिवाय वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

जंगालाचा राजा सिंह नेहमीच भक्ष्याच्या शोधात दिसतो. सध्या असाच एक सिंहाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तो भक्ष्याच्या शोधात भटकत असताना झोपलेल्या बिबट्याजवळ पोहोचतो. सिंह आणि बिबट्याची झुंज कधी पाहिली आहे का? पण यात असंच काहीसं घडतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की, जंगलाचा राजा सिंह भक्षाच्या शोधात इकडे तिकडे भटकतो आणि मग त्याची नजर झोपलेल्या बिबट्यावर पडते. मग काय, तो गुपचूप त्याच्यापर्यंत पोहोचतो. तो हल्ला करणार इतक्यात काय घडतं पाहा...

सिंह बिबट्यावर हल्ला करण्यापूर्वीच बिबट्या जागा होते. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी होते. आत्तापर्यंत तुम्ही सिंह आणि बिबट्या इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. पण दोघे एकमेकांशी भिडल्याचे कधीच पाहिले नसेल. त्यामुळेच feline.unity नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ विशेष चर्चेचा विषय आहे.

Web Title: lion suddenly attacks leopard for hunt wild animals fight in jungle forest Video see what happened next