सार्वजनिक टॉयलेटमध्ये दबा धरुन बसलेला सिंह, बाहेर पडताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 12:39 IST2021-10-05T12:38:53+5:302021-10-05T12:39:02+5:30

सिंह (Lion video), वाघ असे प्राणी जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयातच पाहायला मिळतात. पण कल्पना करा अचानक असे प्राणी तुमच्यासमोर आले तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

lion coming out of public toilet shocking video goes viral | सार्वजनिक टॉयलेटमध्ये दबा धरुन बसलेला सिंह, बाहेर पडताच...

सार्वजनिक टॉयलेटमध्ये दबा धरुन बसलेला सिंह, बाहेर पडताच...

सिंह (Lion video), वाघ असे प्राणी जंगलात किंवा प्राणीसंग्रहालयातच पाहायला मिळतात. पण कल्पना करा अचानक असे प्राणी तुमच्यासमोर आले तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता ज्यामध्ये एक शौचालय दिसतं आहे. बऱ्याच वेळाने या शौचालयाच्या दारातून एक भलामोठा सिंह बाहेर पडतो. शौचालयाच्या दारात तो किती तरी वेळ उभा राहतो. त्याला प्रत्यक्षात पाहणाऱ्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात हे खतरनाक दृश्य कैद करून घेतलं. त्यांना तर धक्काच बसला. व्हिडीओत त्यांचा आवाज ऐकून ते लोक किती घाबरलेले आहेतच थोड्या वेळाने सिंह टॉयलेटमधून बाहेर पडतो आणि दूर निघून जातो.

@WildLense_India या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता तुम्ही म्हणाल नेमकं हे सार्वजनिक टॉयलेट आहे कुठचं. आजूबाजूचा परिसर पाहता हे टॉयलेट एका जंगलातीलच आहे, असं वाटतंय. पण कुठचं ते माहिती नाही. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हीसुद्धा फिरायला गेला तर टॉयलेटला जाताना जरा जपूनच.

Web Title: lion coming out of public toilet shocking video goes viral