विमानात 400 प्रवासी, अचानक कोसळली वीज; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 21:09 IST2024-03-10T21:08:22+5:302024-03-10T21:09:57+5:30
उडत्या विमानावर वीज कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

विमानात 400 प्रवासी, अचानक कोसळली वीज; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...
Lightning hits plane leaving YVR: निसर्ग अनेकदा तुम्हाला अशी भयानक दृश्ये दाखवतो, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. असे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तुम्ही अनेकदा वीज कोसळताना पाहिली असेल, पण हवेत उडणाऱ्या विमानावर वीज कोसळलेली पाहिली आहे का? व्हायरल व्हिडिओमध्ये आकाशात उंच उडणाऱ्या विमानावर वीज पडल्याचे दिसत आहे.
विमानावर अचानक कोसळली वीज
हा व्हिडिओ एअर कॅनडा बोइंग 777 चा आहे. विमानाने व्हँकुव्हरहून उड्डाण केले आणि हवेत असताना त्यावर अचानक त्यावर वीज कोसळली. विमानावर वीज कोसळली, तेव्हा त्यात सूमारे 400 प्रवासी होते. हा व्हिडिओ नुसता पाहूनच थरकाव उडतोय, तर त्या विमानात बसलेल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल...सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणता व्हायरल होतोय.
😳 Air Canada Boeing 777 getting struck by lightning while departing Vancouver, BC over the weekend. pic.twitter.com/naXCRouaVt
— Thenewarea51 (@thenewarea51) March 5, 2024
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, विमानाला वीजेमुळे नुकसान का झाले नाही? तर, विमानाचा बाहेरील भाग कार्बन आणि तांब्याने बनलेला असतो. त्यामुळे विमानावर वीज पडली तरी, त्यात बसलेल्या प्रवाशांवर किंवा विमानावर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही.