महिलेने भर चौकात ट्रक ड्रायव्हरला धु धु धुतलं, धक्कादायक कारण आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:25 IST2021-08-22T17:14:12+5:302021-08-22T17:25:04+5:30

लखनऊमधील (Lucknow) व्हायरल गर्ल प्रियदर्शिनी (Viral Girl Priyadarshini) ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. अशात आता आणखी एक महिला चर्चेत आली आहे. साडीमध्ये दिसणाऱ्या या महिलेनं चौकातच एका व्यक्तीची धुलाई केली आहे. 

lady beating tempo driver on road goes viral on social media | महिलेने भर चौकात ट्रक ड्रायव्हरला धु धु धुतलं, धक्कादायक कारण आलं समोर!

महिलेने भर चौकात ट्रक ड्रायव्हरला धु धु धुतलं, धक्कादायक कारण आलं समोर!

लखनऊमधील (Lucknow) व्हायरल गर्ल प्रियदर्शिनी (Viral Girl Priyadarshini) ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. अशात आता आणखी एक महिला चर्चेत आली आहे. साडीमध्ये दिसणाऱ्या या महिलेनं चौकातच एका व्यक्तीची धुलाई केली आहे. 

सोशल मीडिया साईट ट्विटरवर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लखनऊच्या टेढी पोलीस चौकात शूट केला गेला आहे. यात एक टेम्पो ड्रायव्हर (Tempo Driver) दिसत आहे. हा व्यक्ती टेम्पोमधून उतरून ट्राफिक पोलिसांकडे (Traffic Police) दोन युवकांची तक्रार करत आहे. त्यांच्यात टेम्पोच्या भाड्यावरुन वाद सुरू आहे. इतक्यात केशरी रंगाची साडी घातलेली एक महिला तिथे पोहोचते.

ही महिलादेखील त्या दोन युवकांसोबतच होती. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून तिनं चौकातच आपल्या पायातील चप्पल काढली आणि ती टेम्पो चालकाला मारहाण करू लागली. याप्रकरणी आतापर्यंत कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. महिला या व्यक्तीला मारत असल्याचं पाहून आसपासचे पोलीस कर्मचारी बचावासाठी पुढे आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: lady beating tempo driver on road goes viral on social media