लाडका दाजी! जेवण आवडले नाही, मेव्हण्याने नववधूला तिथेच ठेवून वरात माघारी नेली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 12:12 PM2020-12-06T12:12:53+5:302020-12-06T12:13:41+5:30

Indian Wedding: सर्वकाही मस्त सुरु होते. डीजेवर नातेवाईक लुंगी डान्स करत होते. लग्नाचे विधीही जवळपास पूर्ण होत आले होते.

Ladka Daji! Not liking the meal, Grooms left the bride and took varat back to home | लाडका दाजी! जेवण आवडले नाही, मेव्हण्याने नववधूला तिथेच ठेवून वरात माघारी नेली

लाडका दाजी! जेवण आवडले नाही, मेव्हण्याने नववधूला तिथेच ठेवून वरात माघारी नेली

googlenewsNext

लग्न असेल तर घरच्या जावयाचा आधी मानपान काढावा लागतो. नाहीतर तो रुसला तर दिलेल्या पोरीला त्रास सहन करावा लागतो. लग्नामध्ये भावोजी नाराज झाला म्हणून बसलेल्या पंक्तीतून नववधूला सोडत मेहुण्याने वरात माघारी नेल्याचा प्रकार घडला आहे. 


हा धक्कादायक प्रकार अलीगढमध्ये समोर आला आहे. कारण काय तर त्या लग्नात नवरदेवाच्या भावोजीला जेवण पसंत पडले नाही. यामुळे भावोजी आणि नवरदेवाच्या मेहुण्यामध्ये बाचाबाची झाली. गोष्ट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली. जेव्हा प्रकरण पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी दोघांनाही समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पक्ष अडून राहिले, यामुळे वरात नवरीविनाच माघारी गेली. आता सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होऊ लागला असून अनेकांनी यावर खिल्ली उडविली आहे. 


‘हिंदुस्तान टाइम्स’ च्या बातमीनुसार बुलंदशहरच्या खुर्जायेथून बुधवारी रात्री जवाच्या सिकंदरपूर कोटामध्ये वरात आली होती. सर्वकाही मस्त सुरु होते. डीजेवर नातेवाईक लुंगी डान्स करत होते. लग्नाचे विधीही जवळपास पूर्ण होत आले होते. अशातच नवरदेवाचा भावोजी जेवायला गेला होता. तिथे त्याला ते जेवण चविष्ठ लागले नाही. जेवण न आवडल्याने त्याने नवरीच्या कुटुंबियांसमोर नाराजी व्यक्त केली. 


इथूनच पुढच्या वादाला सुरुवात झाली. नववधूच्या भावाने नवरदेवाच्या नाराज भावोजीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र हा भावोजीचा अपमान असल्याने तो काही ऐकायला तयार नव्हता. तसेच वाद वाढवत तो मुलीकडच्यासोबत दादागिरी करू लागला. हे पाहून मुलीकडच्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पक्ष माघार घ्यायला तयार नव्हते. यामुळे दारी आलेली वरात नववधूला न घेताच माघारी गेली. 

Web Title: Ladka Daji! Not liking the meal, Grooms left the bride and took varat back to home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.