मॅगझिनच्या कव्हर फोटोमुळे कायली ट्रोल, 'इश्क' सिनेमातील सीनची यूजर्सना आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 17:02 IST2018-08-20T16:59:57+5:302018-08-20T17:02:48+5:30

या फोटोची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे. पण इतक्या सुंदर मुलीची खिल्ली का उडवली जात आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असले तर हा फोटो नीट बघा. 

Kylie Jenner Gets Trolled For Her First Vogue Cover | मॅगझिनच्या कव्हर फोटोमुळे कायली ट्रोल, 'इश्क' सिनेमातील सीनची यूजर्सना आठवण!

मॅगझिनच्या कव्हर फोटोमुळे कायली ट्रोल, 'इश्क' सिनेमातील सीनची यूजर्सना आठवण!

फोर्ब्सच्या कमी वयात सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान मिळवणारी कायली जेनर गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. आता ती तिच्या व्होग कव्हर पेजवर आलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. या फोटोची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे. पण इतक्या सुंदर मुलीची खिल्ली का उडवली जात आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असले तर हा फोटो नीट बघा. 

झालं असं की, कायलीचा या कव्हर पेजवरील फोटो फारच विचित्र असल्याचं बोललं जात आहे. या फोटोत तिच्या बॉडीला ट्विस्ट करण्यात आलंय. शरीराचा वरचा भार सरळ आणि खालचा भाग उलटा दाखवला आहे.

आता हा फोटो पाहून तुम्हाला अजय देवगण आणि आमिर खानच्या 'इश्क' सिनेमाची नक्कीच आठवण आली असेल. कारण या सिनेमातही असा एक भन्नाट सीन आहे. त्या सीनचे फोटोही कायलीच्या फोटोसोबत व्हायरल झाले आहेत. 











आता सध्या कायलीच्या या फोटोवरुन सोशल मीडियात चांगली खिल्ली उडवली जात आहे. 

Web Title: Kylie Jenner Gets Trolled For Her First Vogue Cover