क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:12 IST2025-12-25T17:10:50+5:302025-12-25T17:12:33+5:30
Krish ka Gana Sunega Viral Video: व्हायरल बॉय 'धूम'च्या (Viral Boy Dhoom) व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिलीये

क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Krish ka Gana Sunega Viral Video: सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे रातोरात कोणाचेही नशीब बदलू शकते. अलिकडेच, राजू कलाकर नावाचा व्यक्ती त्याच्या "तूने दिल पर चलायें छुरियाँ" या गाण्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. आता व्हायरल बॉय 'धूम'ने (Viral Boy Dhoom) त्याच्या "क्रिश का गाना सुनेगा" या मीमने खऱ्या अर्थाने तुफान चर्चेत आला आहे.
सुमारे १९-२० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ऋतिक रोशनच्या सुपरहिरो 'क्रिश' चित्रपटामधील "दिल ना दिया" हे गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. याचे कारण म्हणजे व्हायरल बॉय धूम. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात तो सुरुवातीला रस्त्याच्या कडेला उभा राहून काही लोकांना विचारतो, 'क्रिश का गाना सुनेगा..?' लोक त्याला गाणे ऐकवण्यासाठी आग्रह करतात. त्यावर तो गायला सुरूवात करतो. त्यातही तो स्वत:च्या अनोख्या स्टाइलने गाणे गातो. त्यातही गाण्याच्या शब्दांमध्येच 'ले बेटा' हा शब्द घुसवतो. त्याचा हा गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, याचे मीम्स वापरून इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर रील आणि शॉर्ट्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहेत. प्रमुख प्रभावशाली कलाकार त्यावर आधारित व्हिडिओ देखील बनवत आहेत.