VIDEO : दरवाज्यावर फणा काढून बसला होता कोब्रा, येणाऱ्या-जाणाऱ्यांची पंचाईत....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 16:51 IST2021-10-25T16:49:19+5:302021-10-25T16:51:29+5:30
Social Viral : हा व्हिडीओ २४ सेकंदाचा आहे. ज्यात एक खतरनाक कोब्रा साप घराच्या मेन दरवाज्यावर बसलेला आहे. तो नुसता बसून नाही तर फणा काढून बसलेला आहे.

VIDEO : दरवाज्यावर फणा काढून बसला होता कोब्रा, येणाऱ्या-जाणाऱ्यांची पंचाईत....
सोशल मीडियावर एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक कोब्रा फणा काढून एका दरवाज्यावर बसलेला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. हा व्हिडीओ पाहून लोक म्हणाले की ही बेस्ट सिक्युरिटी सिस्टीम आहे. तर काही लोक म्हणाले की, याला बघून लोक घरात शिरण्याचा काय तर आजूबाजूला फिरण्याचाही विचार करणार नाही.
हा व्हिडीओ ट्विटरवर @DoctorAjayita ने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि २०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
This Intrusion Defense System is lit! pic.twitter.com/VyrzSHcnjb
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) October 25, 2021
हा व्हिडीओ २४ सेकंदाचा आहे. ज्यात एक खतरनाक कोब्रा साप घराच्या मेन दरवाज्यावर बसलेला आहे. तो नुसता बसून नाही तर फणा काढून बसलेला आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्याला जवळून शूट करण्याचा प्रयत्न केला तर त्याने दोन-तिनदा फणा मारण्याचा प्रयत्नही केला. साप बराच मोठा आणि आक्रामक दिसत आहे.