Viral Video: आपल्या कुत्र्यासाठी कांगारुसोबत भिडला व्यक्ती, शेवटी वेळ आली पश्चातापाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 17:24 IST2022-02-27T17:20:57+5:302022-02-27T17:24:02+5:30
एक व्यक्तीची आणि कांगारूची लढाई झाली आहे. एका श्वानासाठी प्राणी आणि माणूस आपसात भिडले.

Viral Video: आपल्या कुत्र्यासाठी कांगारुसोबत भिडला व्यक्ती, शेवटी वेळ आली पश्चातापाची
प्राण्यांची प्राण्यांसोबत, माणसांची माणसांसोबत फायटिंग तुम्ही पाहिली असेल. पण प्राणी आणि माणसांची फायटिंग क्वचितच पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्तीची आणि कांगारूची लढाई झाली आहे. एका श्वानासाठी प्राणी आणि माणूस आपसात भिडले (Kangaroo man fight).
कांगारू लढाईसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आपल्या विरोधकांना ते लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात. मग विचार करा, या कांगारूसमोर एखादा माणूस असेल तर त्याचं काय होईल. श्वानासाठी आमनेसामने आलेल्या माणूस आणि कांगारूचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. व्यक्तीने आपल्या श्वानांना वाचवण्यासाठी कांगारूचा सामना केला. त्याच्यासमोर छाती ताणून त्याच्याशी दोनहात करायला उभा राहिला. कांगारूनेही या व्यक्तीवर भयानक हल्ला केला. या लढाईत तरुणासोबत जे घडलं ते पाहूनच धडकी भरते.
व्हिडीओत पाहू शकता एका छोट्याशा तलावाजवळ एक व्यक्ती उभी आहे, त्याच्यासोबत त्याचा पाळीव कुत्रा आहे. इतक्यात एक कांगारू तिथं येतो. त्याच्यापासून आपल्या कुत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करते. आपल्या कुत्र्यांना लांब करून कांगारूला सामोरं जाते. त्याचवेळी कांगारू त्या व्यक्तीवर हल्ला करतं, त्याला लाथ मारतं. त्यानंतर ही व्यक्ती जमिनीवर धाडकन कोसळते. आपल्या मालकावर हल्ला झालेला पाहताच त्याचे श्वानही कांगारूवर भुंकू लागतात. श्वानाला वाचवण्यासाठी या व्यक्तीला कांगारूच्या लाथाबुक्क्या खाव्या लागल्या.
या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनीच ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.