जेसीबीच्या खुदाईनंतर जेसीबीची पिटाई झाली व्हायरल, दोन बुल्डोझर अन् जेसीबी यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 19:18 IST2021-12-26T19:12:41+5:302021-12-26T19:18:31+5:30

कुणासाठी थांबत नाही. ती चालत राहते. जेसीबीच्या बाबतीतही तेच झालंय. एकेकाकी खुदाईसाठी ट्रेन्ड होणाऱ्या जेसीबीचा आता एक नवा आणि भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. यात जेसेबीच्या खुदाईऐवजी जेसीबीची पिटाई होत असल्याचं दिसून आलंय.

jcb and bulldozer funny fight video goes viral on social media | जेसीबीच्या खुदाईनंतर जेसीबीची पिटाई झाली व्हायरल, दोन बुल्डोझर अन् जेसीबी यांच्यात जुंपली

जेसीबीच्या खुदाईनंतर जेसीबीची पिटाई झाली व्हायरल, दोन बुल्डोझर अन् जेसीबी यांच्यात जुंपली

एक काळ #JCB_की_खुदाई (JcbKiKhudai)  या ट्रेन्डनं गाजवलाय. त्याला कारणं अनेक आहेत. पण आता #JCBच्या खुदाईचा काळ मागे सरलाय. 2021 संपत आलंय. वेळ कुणासाठी थांबत नाही. ती चालत राहते. जेसीबीच्या बाबतीतही तेच झालंय. एकेकाकी खुदाईसाठी ट्रेन्ड होणाऱ्या जेसीबीचा आता एक नवा आणि भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. यात जेसेबीच्या खुदाईऐवजी जेसीबीची पिटाई होत असल्याचं दिसून आलंय.

भांडण करण्यासाठी कारण फार महत्त्वाचं नसतं. भांडण कशावरुनही होऊ शकतं. आता जेसीबीविरोधात दोन बुलडोझर का उभे ठाकलेत, हा प्रश्न अनेकांना पडलाय. कदाचित ज्या बांधकामाच्या ठिकाणी हा प्रकार सुरु आहेत, तिथलं काम थांबवण्यासाठी बुलडोझरच्या मदतीनं जेसीबीला रोखण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज काहींनी बांधलाय. पण एकंदरीतच जेसीबी आणि बुलडोजरमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं या व्हिडीओत दिसून आलंय.

bridlove_store नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओतील भांडणाची तुलना WWEसोबत केली आहे. तर काहींनी या व्हिडीओतून जेसीबीची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडलाय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, हे काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र लोकं या व्हिडीओची सोशल मीडियात चांगलीच मजा घेताना पाहायला मिळालेत.

Web Title: jcb and bulldozer funny fight video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.