Jaya Kishori Video: 'एका व्यक्तीसोबत 50 वर्षे एका खोलीत...', कथावाचक Jaya Kishori लग्नाबाबत स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 20:00 IST2023-03-22T19:59:44+5:302023-03-22T20:00:28+5:30
Jaya Kishori: देशातील प्रसिद्ध कथावचक जया किशोरी यांची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहेत.

Jaya Kishori Video: 'एका व्यक्तीसोबत 50 वर्षे एका खोलीत...', कथावाचक Jaya Kishori लग्नाबाबत स्पष्टच बोलल्या
Jaya Kishori : देशातील सुप्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कथा वाचनादरम्यान त्यांचा सौम्य स्वभाव आणि नेहमी हसरा चेहरा लोकांना खूप प्रभावित करतो. यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातील त्यांचे भक्त त्यांची कथा ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. जया किशोरी आपल्या कथेदरम्यान जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
जया किशोरींचा असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी लग्नाबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या कथा आणि भजनांमध्ये त्या नेहमीच जीवनाशी संबंधित समस्यांवर लोकांचा मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी लग्न आणि लाइफ पार्टनरबाबत लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओमध्ये जया किशोरी म्हणाल्या की, 'लग्न हे खूप जबाबदार नाते आहे. आजकाल लग्न लोकांच्या टू डू लिस्टचा एक भाग बनले आहे. लोक लग्नाला औपचारिकता मानतात. पण, असे करू नये. लोक लग्नाबाबत अजिबात गंभीर नाहीत. मुलगा असो की मुलगी, वयात आल्यावर त्यांची लग्ने होत असतात. लग्न म्हणजे तुम्हाला पुढील 50-60 वर्षे एका व्यक्तीसोबत एकाच खोलीत राहावे लागणार आहे. त्यामुळे लग्नाबाबत अनेक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.'
या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ जया किशोरीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान, मागे एकदा जया किशोरी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी वेळ आल्यावर लग्न करणार असल्याचे सांगितले होते. यासोबतच लग्न झाल्यावर आई-वडिलांपासून दूर राहणार नसल्याची अट घातली.