"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:25 IST2025-08-05T14:24:22+5:302025-08-05T14:25:31+5:30

गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी एक तरुण चक्क मदत मागत आहे. विशेष म्हणजे त्याने UPI स्कॅनर असलेले पोस्टर भिंतींवर लावले आहेत.

jaipur help me upi scanner poster all over the city by boyfriend goes viral | "Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर

फोटो - आजतक

आजारासाठी, शिक्षणासाठी, समाजसेवेसाठी अनेक डोनेशन कँप तुम्ही पाहिले असतील. पण आता एक हटके घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाण्यासाठी एक तरुण चक्क मदत मागत आहे. विशेष म्हणजे त्याने UPI स्कॅनर असलेले पोस्टर भिंतींवर लावले आहेत. जे आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. राजस्थानमधील जयपूर शहराच्या भिंतींवर सध्या हे पोस्टर पाहायला मिळत आहे. 

"मला मदत करा, मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचं आहे, डोनेशन द्या" असं पोस्टरवर लिहिलं आहे.  पोस्टरसोबत UPI स्कॅनर QR कोड देखील जोडला आहे. सोशल मीडियावर हे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहरातील पत्रिका गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, गौरव टॉवर सिटी यासारख्या पर्यटन स्थळांवर असे पोस्टर चिकटवले गेले आहेत. 

काही तरुण त्यावर दिलेला QR कोड स्कॅन करून पैसेही पाठवत आहेत. राहुल प्रजापत नावाच्या एका तरुणाने हे केल्याचं म्हटलं जात आहे, जो त्याच्या PNB बँक अकाऊंटमध्ये हे डोनेशन घेत आहे. प्रेमासाठी क्राउड फंडिंग करण्याच्या ऑनलाइन ट्रिकला 'प्रेमी स्टार्टअप' असं नाव देण्यात आलं आहे. 

काही लोक फेमस होण्यासाठी केलेला स्टंट, भावनिक फसवणूक असल्याचं म्हणत आहेत. राहुल प्रजापतने लढवलेली शक्कल सोशल मीडियावर काही वेळातच खूप व्हायरल झाली आहे. अनेकांनी या मदतीची खिल्ली देखील उडवली आहे. "प्रेमात पडला, खर्चाला घाबरला आणि आता भीक मागून व्यवस्था करतोय" असं लोक म्हणत आहेत. 

Web Title: jaipur help me upi scanner poster all over the city by boyfriend goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.