VIDEO: ITBP जवानाचा शून्य अंश सेल्सिअस तापमानात व्यायाम; १८,००० फूट उंचीवर केले सूर्यनमस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:50 IST2022-07-20T18:48:46+5:302022-07-20T18:50:15+5:30
सोशल मीडियावर एका जवानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIDEO: ITBP जवानाचा शून्य अंश सेल्सिअस तापमानात व्यायाम; १८,००० फूट उंचीवर केले सूर्यनमस्कार
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एका जवानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण या व्हिडीओत एक जवान आपल्या धाडसाने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचा (ITBP) जवान शून्य अंश सेल्सिअस तापमानामध्ये सूर्यनमस्कार करताना पाहायला मिळत आहे. लडाखमधील कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायांनी योगाभ्यास करताना जवान आपल्या फिटनेसचे प्रदर्शन करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे १८,००० फूट उंचीवर सैनिक सूर्यनमस्कार करत आहे. नेटकरी या व्हिडीओवरून जवानाच्या धाडसाची प्रशंसा करत आहेत.
१८,००० फूट उंचीवर केली योगासनं
ही व्हिडीओ न्यूज एजेंसी एएनआयने ट्विटरवर शेअर केली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, एक ITBP चा जवान लडाखमध्ये जवळपास १८,००० फूट उंचीवर गोठावणाऱ्या थंडीत आणि सफेद बर्फाच्या चादरेवर सूर्यनमस्कार करत आहे. दरम्यान आता ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी जवानाचे कौतुक करत आहेत.
#WATCH | An ITBP officer practicing 'Surya Namaskar' at 18,000 feet in Ladakh in snow conditions & sub-zero temperatures
— ANI (@ANI) July 20, 2022
(Source: ITBP) pic.twitter.com/URB8CIMHQk
या ५४ सेकंदाच्या या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत. योगासन करत असलेल्या जवानाची स्तुती करताना सोशल मीडियावरील युजर्संनी जवानाला सुपरमॅनची उपमा दिली आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये शरीरावर सर्व कपडे नसताना देखील जवानाने केलेल्या या व्यायामामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.