अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आधी म्हणाले, इराणसोबत युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी विधान केले ते थेट होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणाचा ताबा राहील याबद्दल! ट्रम्प यांच्या याच विधानाची आता इराणकडून खिल्ली उडवली जात आहे. इराणच्या दक्षिण आफ्रिकेतील उच्चायुक्तालयाने एक गमंतीशीर फोटो शेअर केला आहे.
इराणच्या दक्षिण आफ्रिकेतील उच्चायुक्तालयाने एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. 'होर्मुझ सामुद्रधुनीवर माझं आणि अयातुल्लाह यांचे नियंत्रण राहील', या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचाच उल्लेख केला आहे. त्यासोबत एक फोटो शेअर करण्यात आला आहे. कारमधील स्टेअरिंग आहे. त्याला बाजूच्या सीटवरील व्यक्तीसमोर खेळणीतील स्टेअरिंग दाखवण्यात आलेले आहे.
आणखी एक व्हिडीओ इराणकडून शेअर करत ट्रम्प यांना डिवचण्यात आले आहे. स्वतःला होर्मुझचे विधाता समजाणाऱ्या ट्रम्प यांना घाम फुटला आहे. इराणने अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ले चढवल्यानंतर ट्रम्प घाबरले आहेत, अशा शब्दात इराणने डिवचले आहे.
ट्रम्प काय म्हणालेले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या नियंत्रणाबद्दल विचारले. त्यावर ट्रम्प म्हणाले की, 'यावर दोघांचे संयुक्त नियंत्रण असेल. कदाचित माझे आणि जे नवे अयातुल्लाह असतील, अशा दोघांचे होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण असेल.'
Web Summary : Iran ridiculed Trump's claim of controlling the Strait of Hormuz. They shared a meme implying shared control. Trump had suggested joint control with the future Ayatollah after earlier discussing de-escalation.
Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य को नियंत्रित करने के ट्रम्प के दावे का उपहास उड़ाया। उन्होंने एक मीम साझा किया जिसका अर्थ है साझा नियंत्रण। ट्रम्प ने पहले तनाव कम करने पर चर्चा के बाद भविष्य के अयातुल्ला के साथ संयुक्त नियंत्रण का सुझाव दिया था।