VIDEO : लग्नात पोहोचला एक्स-बॉयफ्रेन्ड, पतीसमोरच नवरीने मारली त्याला मिठी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:06 IST2021-01-30T16:00:24+5:302021-01-30T16:06:01+5:30
अर्थातच यात काहीच चुकीचं नाही. पण लोक या गोष्टीने हैराण झाले की, नवरीने स्टेजवर नवरदेवाला विचारले की, काय ती तिच्या एक्सला एकदा मीठी मारू शकते?

VIDEO : लग्नात पोहोचला एक्स-बॉयफ्रेन्ड, पतीसमोरच नवरीने मारली त्याला मिठी....
तुमच्या लग्नात जर तुमचा जुना प्रेमी पोहोचला तर तुम्हाला आनंद होईल की भीती वाटेल? तुम्हाला वाटत असेल की, हे अवघड असतं. तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण नुकताच इंडोनेशियातील एका नवरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिचा एक्स बॉयफ्रेन्ड लग्नात तिला शुभेच्छा देताना दिसत आहे. अर्थातच यात काहीच चुकीचं नाही. पण लोक या गोष्टीने हैराण झाले की, नवरीने स्टेजवर नवरदेवाला विचारले की, काय ती तिच्या एक्सला एकदा मिठी मारू शकते?
झालं असं की, लग्नात नवरीचा एक्स पोहोचला होता. जेव्हा तो नवरीला शुभेच्छा द्यायला गेला तेव्हा त्याने तिच्याशी हॅंडशेकही केला. अशात नवरीने पतीला परवानगी मागितली की, काय ती तिल्या एकदा हग करू शकेत? पतीनेही होकार दिला आणि तिने त्याला हग केलं. आता सोशल मीडियावर या खास क्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ( हे पण वाचा : प्रेमात दगा मिळालेल्यांसाठी अनोखी ऑफर, एक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही!)
हा व्हिडीओ पाहून अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काही लोकांनी लग्नाच्या दिवशी एक्सला हग करण्यावरून टीका करत आहेत. तर काहींनी नवरदेवाप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे. एक व्यक्तीने लिहिले की, तुझा पती यापेक्षा चांगल्या गोष्टीचा हकदार आहे. तर एकाने लिहिले की, तिने निदान परवानगी तरी मागितली. अनेकांना हा व्हिडीओ आवडला. अनेकजण सकारात्मक प्रतिक्रियाही देत आहेत.