VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 16:17 IST2024-12-01T16:15:30+5:302024-12-01T16:17:11+5:30
Wall Plaster Jugaad on JCB, Viral Video: बहुतेक वेळा विविध जुगाड करून लोक आपली कामं सोपी करताना दिसतात

VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर
Wall Plaster Jugaad on JCB, Viral Video: सध्या ट्रेंडिंग व्हिडीओचे युग आहे. एखाद्या ठिकाणी काही हटके गोष्ट दिसली की ती लगेच कॅमेऱ्यात कैद केली जाते आणि सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होतो. आपल्या भारत देशातील लोक या बरीच पुढे असतात. जुगाड कसा करावा, यात भारतीयांचा हात कुणीच धरू शकत नाहीत, असे नेटकरी अनेकदा म्हणताना दिसतात. असाच एका जुगाड सध्या व्हायरल झालाय. या व्हिडिओंमध्ये काही लोक कमी सामान असूनही एक वेगळीच शक्कल लढवून आपलं काम पूर्ण करताना दिसत आहेत. जेसीबीचा अशाही प्रकारे वापर होऊ शकतो हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Trending Indian Jugaad Video)
इमारत बांधताना मजुरांना खूप मेहनत घ्यावी लागते याची साऱ्यांनाच कल्पना असते. अशा परिस्थितीत बहुतेक मजूर विविध जुगाड करतात आणि आपले काम सोपे करून टाकतात. सहसा इमारतीच्या बाहेरच्या बाजुला काहीही काम असले तर बांबूंचा आधार उभारला जातो किंवा गच्चीतून दोरखंड बांधून व्यक्तिला खाली उतरवले जाते. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वेगळीच गोष्ट दिसत आहे. एक ट्रॅक्टरची ट्रॉली चक्क जेसीबीच्या मदतीने उचलून धरलेली आहे आणि त्या ट्रॉलीत उभे राहून मजूर तिसऱ्या मजल्यावर भिंतीला बाहेरून प्लास्टरचे काम करत आहेत. हा प्रकार नक्कीच थक्क करणारा आहे कारण, असा जुगाड तुम्ही याआधी कधीच पाहिलेला नसेल. पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ-
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर duhewala_nirmal_ नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हिडीओ पोस्ट केल्यापासून ९० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि लाखो लोकांनी तो पाहिला असून त्यावर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'खतरनाक जुगाडची ही लेव्हल पाहायला चांगली वाटत असली तरी यात खूप जोखीम आहे.' तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'यामुळे काम नक्कीच सोपे होईल, पण तरीही जीवाला धोका निर्माण होईल.' याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.