Ind vs NZ Test: कानपूर टेस्ट मॅचवेळी गुटखा खाणारा युवक कोण? रातोरात फोटो झाला प्रचंड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 06:50 PM2021-11-26T18:50:31+5:302021-11-26T18:50:53+5:30

ग्रीनपार्क येथे अनेक काळानंतर टेस्ट मॅच खेळली गेली. कानपूर पोलिसांनी स्टेडिएममध्ये अनावश्यक गोष्टी घेऊन जाण्यापासून रोखलं होतं. प्रेक्षकांना चेकींगकरुनच आतमध्ये सोडलं. तरीही काहीजण आतमध्ये गुटखा घेऊन गेल्याचं आढळलं.

Ind vs NZ Test: Netizens go on a meme fest as man chews ‘gutka’ during Kanpur Test | Ind vs NZ Test: कानपूर टेस्ट मॅचवेळी गुटखा खाणारा युवक कोण? रातोरात फोटो झाला प्रचंड व्हायरल

Ind vs NZ Test: कानपूर टेस्ट मॅचवेळी गुटखा खाणारा युवक कोण? रातोरात फोटो झाला प्रचंड व्हायरल

Next

कानपूर – भारत-न्यूझीलंड टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या त्या व्हायरल व्यक्तीचा शोध अखेर लागला आहे. गुटखा खाण्याच्या अंदाजात फोनवर बोलत असलेला हा व्यक्ती रातोरात सोशल मीडियात व्हायरल झाला. टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत हजर होता. परंतु यावेळी त्यांचा अंदाज बदलला होता. रातोरात देशात व्हायरल झालेल्या या व्यक्तीचं नाव शोभित पांडेय असं आहे.

शोभित पांडेय प्रेक्षक गॅलरीत हजर होता. यावेळी त्याने गुटख्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली. कानपूरच्या माहेश्वरी इथं राहणाऱ्या शोभितनं स्पष्टीकरण दिले की, विनाकारण मला बदनाम केले जात आहे. मी गुटखा खात नव्हतो तर सुपारी खात होतो. उद्योगपती असलेले शोभित स्टेडिएमच्या गर्दीत अचानक फोनवर बोलताना पाहिल्यानंतर त्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या व्हायरल फोटोनं शोभित यांना मनस्ताप सहन करावा लागला.

तसेच स्टेडिएममध्ये अनेकजण गुटखा खात होते पण त्यांच्यावर कॅमेरा फोकस का केला नाही माहिती नाही. व्हिडीओत माझ्या बाजूला दिसत असलेली मुलगी माझी बहीण आहे. मला क्रिकेट आवडतं. स्टेडिएममध्ये जावून भारतन्यूझीलंड मॅच पूर्ण पाहणार असल्याचं शोभितने सांगितले. ग्रीनपार्क येथे अनेक काळानंतर टेस्ट मॅच खेळली गेली. कानपूर पोलिसांनी स्टेडिएममध्ये अनावश्यक गोष्टी घेऊन जाण्यापासून रोखलं होतं. प्रेक्षकांना चेकींगकरुनच आतमध्ये सोडलं. तरीही काहीजण आतमध्ये गुटखा घेऊन गेल्याचं आढळलं.

भारत आणि न्यूझीलंड टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा अखेरचं सत्र सुरु होतं. त्यावेळी टीव्हीवर गुटखा खात मॅच पाहत असलेल्या युवक मोबाईलवर बोलत असल्याचा फोटो समोर आला. टीव्ही स्क्रीनवर झळकणाऱ्या युवकाचा फोटो पाहून सोशल मीडियात नेटिझन्सने अनेक कमेंट्स केल्या. काही क्षणात हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. इतकचं नाही तर काही बड्या लोकांनीही हा फोटो शेअर केला. त्यानंतर आता या व्हायरल झालेल्या युवकाने सगळ्यांसमोर येऊन खुलासा केला आहे. मात्र सोशल मीडियात रातोरात व्हायरल झाल्याने युवकासह त्याच्या घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Web Title: Ind vs NZ Test: Netizens go on a meme fest as man chews ‘gutka’ during Kanpur Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app