किचनमध्ये आग लागली, पतीनं पत्नीला एकटं सोडून बाहेर धूम ठोकली अन् मग...; पाह VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 15:45 IST2022-08-29T15:40:24+5:302022-08-29T15:45:14+5:30
Social Media Viral: या व्हिडिओमध्ये एक महिला किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. तिचा पतीही (Husband) तिच्या मागे काही काम करताना दिसत आहे.

किचनमध्ये आग लागली, पतीनं पत्नीला एकटं सोडून बाहेर धूम ठोकली अन् मग...; पाह VIDEO
इंटरनेट अथवा सोशल मीडियावर मनोरंजनाची कमी नाही. खरे तर आपल्याला ज्या प्रकारचा कंटेंट बघायला आवडो, त्याच पद्धतीचा कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिला जातो. मात्र, यातही, पतीपत्नींसंदर्भातील विनोद पाहणारा वर्ग फार मोठा आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्याला जबरदस्त व्ह्यूज मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करताना भडका उडतो -
या व्हिडिओमध्ये एक महिला किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. तिचा पतीही (Husband) तिच्या मागे काही काम करताना दिसत आहे. यावेळी संबंधित महिलेच्या समोर असलेले भांडे अचानकच आग पकडते. यानंतर जे झाले त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
पत्नीला एकटं सोडून पतीनं ठोकली धूम -
आग लागताच पतीने तेथे असलेल्या मुलाला उचलले आणि पत्नीला किचनमध्ये एकट सोडून बाहेर धूम ठोकली. मात्र, पती स्वयंपाकघरातून बाहेर पडताच आग विझते. पतीचे हे कृत्य पाहून पत्नीला धक्काच बसला आणि मग संतापलेली पत्नी पायातली चप्पल काढून नवऱ्याला मारण्यासाठी धावली. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक गमतीशीर कमेंट करत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. केवळ काही सेकंदांचा असलेला हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या रिअॅक्शन्स देत आहेत. काही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत, तर काही लोक पतीच्या चुकीवर कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.